शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस इच्छूक उमेदवारात नवचैतन्य!

By admin | Updated: September 3, 2014 22:00 IST

वाशिम विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी सोडण्याची जोरदार मागणी.

नंदकिशोर नारे / वाशिमवाशिम : वाशिम -मंगरूळपीर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांमध्ये वाशिमची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्याच्या आग्रही मागणीमुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.जिल्हयातील तिनही विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतिने इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. यावेळी १३ इच्छुक उमेदवारांनी अर्जही नेले परंतु कारंजा विधानसभा मतदार संघ वगळता वाशिम -मंगरूळपीर व रिसोड- मालेगाव मतदार संघ काँग्रेससाठी असल्याने सदर मागणी मान्य होणार नाही तरी सुध्दा काही इच्ठूक उमेदवारांनी अर्ज दिलेत. यामध्ये वाशिम - मंगरूळपीर विधानसभा मतदार संघातून ५, कारंजा मतदार संघातून ६ व रिसोड मतदार संघातून २ इच्छूक उमेदवार होते. वाशिम जिल्हयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष २९ ऑगस्ट रोजी मुंबईवरून आल्यावर त्यांनी सांगितले की, रिसोड विधानसभा मतदार संघ व कारंजा विधानसभा मतदार संघातून आम्ही निवडणूक लढविणार नसून वाशिमसाठी मात्र जागा सोडण्याच्या जोरदार फिल्डींग सुरू आहेत. ही बाब पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळल्याने त्यांच्यामध्ये व इच्छुक उमेदवारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.वाशिम विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतिने निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इच्छूक होते मात्र काँग्रेसच्या वाटेवर जागा असल्याने कोणी पुढाकार घेतला नाही. काही जणांनी केवळ चर्चेसाठी अर्ज भरला तर काहींना जमले तर जमले म्हणून अर्ज भरला. आता वाशिम विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोडण्याच्या मागणीने जोर धरल्याने अनेक इच्छुकांची निराशा झाली. जर खरचं राष्ट्रवादी काँग्रेससाठी जागा सुटली तर. आता आपण पुढाकार घेतला तर अशी कुजबूज सद्या ज्यांनी पक्षाकडे नावे दिली नाही पण इच्छूक आहेत त्यांची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वाशिम विधानसभा मतदार संघावर दावा केला असला तरी तो मिळो किेंवा न मिळो मात्र सद्यस्थितीत तरी पक्षाकडे रेटून धरलेल्या मागणीमुळे का होईना इच्छूक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.दुसरीकडे काँग्रेसपक्ष सहजा-सहजी जागा सोडणार नसल्याने तेही चिंता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांना होत आहे.*इच्छुकांना आमदारकीचे वेधवाशिम विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावी या मागणीमुळे व यावर विचार करण्यात येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांना आमदारकीचे वेध लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकरिता जागा सुटणार नाहीच या विचाराच्या अनेकांनी इच्छूकांच्या यादीत आपले नाव न दिल्याने होत असलेली मागणी आता त्यांना सलत आहे.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतिने जागांची मागणी सुरूच आहे. वाशिम जिल्हयातील तीनही विधानसभा मतदारसंघापैकी कारंजा राष्ट्रवादी काँग्रसकडेच आहे तर रिसोड काँग्रेसकडे राहील. वाशिम - मंगरूळपीर विधानसभा मतदार संघ मात्र राष्ट्रवादी कडे यावा अशी मागणी जोमाने सुरू असल्याने ती मिळूही शकते. मी नुकताच मुंबईवरून आलो असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निणर्य लागण्याची शक्यता आहे.- सुभाष राठोड, वाशिम जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस