शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष ‘एसीबी’च्या जाळ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:21 IST

विद्यार्थ्याची तक्रार: शिष्यवृत्ती प्रमाणपत्रासाठी स्वीकारली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिष्यवृत्तीची पाच हजार रुपयांची रक्कम बँक खात्यातून काढण्यास प्रमाणपत्र मागण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याकडून दोन हजार रुपयांची लाच मिल्लत उर्दू हायस्कूलचा मुख्याध्यापक व राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष सरफराज खान नवाज खान (५० रा. नेहरू नगर) याने प्रयोगशाळा सहायक अय्याज खान इमदाद खान (४० रा. न्यू जोगळेकर प्लॉट) याच्यामार्फत स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना मंगळवारी दुपारी अटक केली. उर्दू मिल्लत हायस्कूलमधील १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार, त्याची शिष्यवृत्ती बँकेत जमा झाली. ही रक्कम काढण्यासाठी या विद्यार्थ्याने मुख्याध्यापक सरफराज खान याच्याकडे प्रमाणपत्र मागितले; परंतु सरफराज खान याने प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यार्थ्याला तीन हजार रुपयांची मागणी केली. तडजोड करून दोन हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाळेमध्ये सापळा लावला. मुख्याध्यापक सरफराज खान याने लाचेची रक्कम शाळेतील प्रयोगशाळा सहायक अय्याज खान याच्याकडे देण्यास सांगितले. विद्यार्थ्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, ईश्वर चव्हाण यांनी केली. ..तर बँकेत होणार होती मुख्याध्यापकावर कारवाईशिष्यवृत्तीची रक्कम बँकेतून काढण्यास लागणारे प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यार्थ्याला मुख्याध्यापक प्रा. सरफराज खान व त्याचा प्रयोगशाळा सहायक अय्याज खान यांनी ३ हजार रुपये मागितले आणि त्यांनी बँकेतून शिष्यवृत्तीचे पैसे काढण्यानंतर बँकेतच तू आम्हाला पैसे दे, असे दोघांनी त्यास म्हटले; परंतु विद्यार्थ्याने आपण पैशांची व्यवस्था केली असून, पैसे शाळेतच देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाळेमध्ये सापळा लावला. तक्रारकर्त्या विद्यार्थ्याने बँकेत पैसे देण्याची तयारी दर्शविली असती तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापक व प्रयोगशाळा सहायकासाठी बँकेत सापळा लावला असता. - अय्याज खान राष्ट्रवादी काँग्रेस घेणार राजीनामा अकोट फैलमधील हाजी नगरातील मिल्लत उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. सरफराज खान नवाज खान यांनी विद्यार्थ्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे प्रकरण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीरतेने घेतले आहे. प्रदेशस्तरावरून प्रा. सरफराज खान यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्षपदाचे काम सोपविले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय तापडिया यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी, सरफराज खान यांच्या कृत्यामूळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून, त्यांच्यावर प्रदेशस्तरावरून कारवाई होईल. त्यासाठी आपण त्यांच्या बाबतीतला अहवाल पक्षाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. - प्रा. सरफराज खान