शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जासाठी नकारघंटा!

By admin | Updated: June 22, 2017 04:55 IST

शासनाचा आदेशच नाही : ३१ हजार शेतक-यांच्या बँकेत चकरा.

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ३0 जून २0१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना शासन निर्णयानुसार दहा हजार रुपये मदत देण्यासही जिल्हतील राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँका तयार नाहीत. त्यामुळे १४ जूनपासून शेतकर्‍यांनी बँकांचे उंबरठे झिजवले, तरी त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्याचवेळी शासनाकडून तसा कोणताच आदेश प्राप्त नसल्याचेही बँक व्यवस्थापनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी आणखीच बिथरले आहेत.शासनाने कर्जमाफी देण्याचा आदेशातील निकषांमध्ये सातत्याने बदल केले आहेत. त्यातच थकबाकीदार शेतकरी ठरवताना ३0 जून २0१६ ची मुदत निश्‍चित केली. त्या दिवशी कर्ज थकीत असलेल्या शेतकर्‍यांना खरीप पेरणीसाठी किमान दहा हजार रुपये कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि व्यापारी बँकांनाच दिले. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचा उल्लेख नाही. त्यातच राष्ट्रीयीकृत बँका राज्य शासनाचा आदेश मानत नाहीत. त्या बँकांना भारतीय रिझर्व्ह बँक किंवा राज्यस्तरीय बँकर्स समितीकडून आदेश मिळणे आवश्यक आहे. आतापर्यंत तसा आदेश मिळालाच नसल्याची माहिती आहे. जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँक खातेदारांचे प्रमाण ५२:४८ असे असताना मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांची गैरसोय झाली आहे. शासनाने केलेल्या थकबाकीदार शब्दाच्या व्याख्येत बसणार्‍या शेतकर्‍यांना तरी राष्ट्रीयीकृत बँकांनी दहा हजार रुपये कर्ज देणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील २३ पैकी कोणत्याही बँकेच्या शाखेत वाटप सुरूच नसल्याची माहिती आहे. आधीच कर्जमाफीची हवा गरम असताना शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना कर्ज न मिळणे, ही बाब संतापजनक ठरत आहे. त्यातून शासन आदेशाच्या फोलपणावरही शेतकर्‍यांचा रोष वाढत आहे. पात्र थकबाकीदार ७५ हजारशासनाने दिलेल्या मुदतीत थकबाकीदार म्हणून पात्र असलेल्या शेतकर्‍यांची संख्या ७५ हजार आहे, त्यापैकी ४४ हजार जिल्हा बँकेत, तर ३१ हजार शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार आहेत. जिल्हा बँकेने आधीच वसुली करून वाटप सुरू केल्याची माहिती आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांकडे पात्र असलेल्या शेतकर्‍यांनी धाव घेतली असता शासनाचा कोणताही आदेश मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये जिह्यातील २३ बँकांच्या शाखांचा समावेश आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना रिझर्व्ह बँक किंवा बँकर्स समितीचा आदेश अद्याप मिळाला नाही. शेतकर्‍यांनी कर्ज मिळण्यासाठी पात्रतेचे निकष पूर्ण केल्यास त्यांना ते मिळण्यास अडचण नाही. - तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, अग्रणी बँक.शासनाने सर्वच बँकांना आदेश दिला आहे. त्यानुसार बँकांनी शेतकर्‍यांना कर्जवाटप करणे आवश्यक आहे. राष्ट्रीयीकृत बँका उपस्थित करीत असलेला मुद्दा वरिष्ठ पातळीवरचा आहे. त्याबाबत शासनाला कळवले जाईल. - जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.