शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: June 11, 2017 02:39 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; बळीराजाची सनद सादर.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतकरी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे प्रचंड अडचणीत आला असून, कधी नव्हे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शेतमालाचे भाव पाडल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. या अडचणीतील शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत शनिवारी शेतकर्‍यांसह हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शांत बसणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी यावेळी दिला. सोबतच बळीराजाची सनद यावेळी अधिकार्‍यांना दिली. हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सत्ताधारी भाजप सरकार शेतकर्‍यांची कर्जमुक्ती न करता निव्वळ आश्‍वासनांच्या खैराती वाटत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला, शेतकर्‍यांसाठी कामे करण्यात येत आहेत याच्या प्रचार प्रसिद्धीवरच भाजप सरकार उधळपट्टी करीत आहे; मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांसाठी काहीही करण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या मागणीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी गत महिनाभरापासून जिल्ह्यातील गावोगावी फिरून कर्जमुक्ती आणि सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर सडेतोड टीका करीत ग्रामीण भागात कर्जमुक्तीचे आंदोलन अधिक तीव्र केले आहे.