शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षश्रेष्ठींनी मागितली अकोला जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातून तीन इच्छुकांची नावे

By admin | Updated: August 25, 2014 03:14 IST

कॉँग्रेस पदाधिकारी पेचात : आठवडभरात होणार उमेदवारीबाबत निर्णय

अकोला : कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देण्यासाठी जिल्हाध्यक्षांकडे जिल्ह्यातील विधानसभानिहाय तीन इच्छुकांची नावे मागितली आहेत. लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कोणती तीन नावे पाठवावी, अशा पेचात पदाधिकारी सापडले आहेत. विधान परिषदेच्या एका जागेवरून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आमने-सामने ठाकले होते; मात्र नंतर या निवडणुकीतून कॉँग्रेसने माघार घेतली होती. या घडामोडीनंतर दोन्ही पक्षात आघाडी होण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता. मात्र कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यातील सर्वच अर्थात २८८ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले. अकोला जिल्ह्यातूनही दोन्ही पक्षांकडून जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, बाळापूर, आकोट, मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले. मात्र मूर्तिजापूर मतदारसंघातून गत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उमेदवार रिंगणात होता. त्यामुळे कॉँग्रेसने मूर्तिजापूर मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नाहीत. दरम्यान, प्रत्येक मतदारसंघासाठी कॉँग्रेस इच्छुकांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरील नेत्यांनी जिल्हाध्यक्षांकडून प्रत्येक मतदारसंघासाठी जास्तीत-जास्त तीन इच्छुकांची नावे मागितली आहेत. ही यादी प्राप्त झाल्यानंतर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.