शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत हवेच!

By admin | Updated: August 15, 2014 01:23 IST

अकोला येथील उपोषण सत्यपाल महाराजांच्या हस्ते सोडले.

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देशभक्त होते. त्यांनी देशातील जनतेला राष्ट्रधर्माचा संदेश दिला. त्यांचे नाव देशातील थोर पुरुषांच्या यादीत सामील व्हायलाच हवे, असे मत सत्यपाल महाराज यांनी गुरुवारी दुपारी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करा, या मागणीसाठी समाजसेवक गणेश पोटे व संजय चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. गुरुवारी सायंकाळी सत्यपाल महाराज यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला आचार्य वेरूळकर गुरुजी, गाडेकर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. तीन दिवस सातत्याने तुकडोजी महाराज यांचे कीर्तन या ठिकाणी करण्यात आले. राष्ट्रसंतांचे नाव समाविष्ट केले नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणारे गाडेकर महाराज म्हणाले की, राष्ट्रसंतांचे नाव देशाच्या थोर पुरुषांच्या यादीत अग्रक्रमाने असायला हवे होते. तुकडोजी महाराजांनी या देशातील तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत केली. युद्धादरम्यान ते देशाच्या सीमेवर गेले होते. ते स्वातंत्र्य सैनिक होते. १९४२ मध्ये इंग्रजांनी त्यांना रायपूरच्या जेलमध्ये टाकले होते. ह्यसारा भारत रहे शिपाई शत्रुको दहशाते, तुकड्यादास कहे भक्ती हो सबको स्फूर्ती दर्शानेह्ण, असा संदेश त्यांनी दिला. जापान येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचे नाव राष्ट्रीय थोर पुरुषांच्या यादीत अग्रक्रमाने घ्यायला हवे. मात्र, या यादीत तसे झाले नाही, यापेक्षा मोठे दु:ख नसल्याची खंत गाडेकर महाराज यांनी व्यक्त केली. उपोषण सोडविताना सत्यपाल महाराज, गाडेकर महाराज, माजी आमदार दाळू गुरुजी, दिलीप आसरे यांच्यासह अनेक गुरुदेवप्रेमी उपस्थित होते.