शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मृत कलावंतांच्या नावे मानधन मंजुर

By admin | Updated: September 13, 2014 00:12 IST

बुलडाण्यातील प्रकार : समाजकल्याण विभाग, पंचायत समितीचा गलथान कारभार.

बुलडाणा : वृद्ध कलावंत मानधन योजनेंतर्गत जिल्ह्यातील वृद्ध कलावंताना दिल्या जाणार्‍या मानधन योजनेच्या यादीत मृत कलावंतांची नावेही समाविष्ट असल्यामुळे, त्यांच्या नावावर दरवर्षी लाखो रू पयांचे मानधन मंजूर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत पात्र वृद्ध कलावंतांना दरमहा १ हजार, १२00 आणि १४00 रूपयापर्यंत वेगवेगळय़ा श्रेणीत मानधन दिले जाते. बुलडाणा जिल्ह्यात मानधनास पात्र ठरलेले असे ७२१ वृद्ध कलावंत आहेत. त्यांना सहा महिन्यांच्या मानधनाची एकत्रित रक्कम दिली जा ते. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने पात्र केलेल्या कलावंताना मानधनाचे वाटप संबंधित पंचायत समितीमार्फत होते. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या पात्र लाभा र्थ्यांच्या यादीतील ७२१ कलावंतांना २९ मार्च रोजीच्या आदेशान्वये ६0 लाख ६ हजार ३00 रुपये मंजुर झाले होते. विशेष म्हणजे मंजुर यादीतील बुलडाणा, मोताळा, मलकापूर, चिखली, शेगाव, नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील १४ कलावंतांचा अगोदरच मृत्यू झालेला असतानाही, मंजूर यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी त्यांच्या नावावर अंदाजे १ लाख ६८ हजार रुपये मंजुर होतात. हे कलावंत किंवा त्यांचे वारस हयात नसताना त्यांची नावे यादीत कशी आणि त्यांच्या नावावर मंजूर झालेले मानधन जाते कोठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस् िथत होत आहे

. ** मृतकांची नावे काढलीच नाही

 वृद्ध कलावंतांना मानधन मंजुर झाल्यानंतर दरवर्षी त्यांच्याकडून हयातीचे प्रमाणत्र घेणे बंधनकारक आहे. पंचायत समितीने हे हयातीचे प्रमाणपत्र समाज कल्याण विभागाकडे सादर झाल्यानंतर समाज कल्याण विभाग मानधन मंजरीसाठी प्रस्ताव पाठविते. त्यानुसार नव्याने मानधन मंजूर होते. लाभार्थी कलावंताचे निधन झाले असल्यास, वारस पत्नीला लाभ मिळतो; मात्र वारसाचा मृत्यू झाल्यानंतर लाभ खंडित केला जातो. म्हणूनच हयातीचे प्रमाणपत्र दरवर्षी सादर करणे बंधनकारक असते; मात्र गत अनेक वर्षापासून मानधनास पात्र कलावंतांचे हयातीचे प्रमाणपत्रच जोडले नसल्याने, मृत्यूनंतर काहींची नावे चार-पाच वर्षापासून यादीत तशीच आहेत.