अकोला: खरीप आणि त्यापाठोपाठ रब्बी पिकांनाही अतवृष्टी आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतर उन्हाळी भुईमुगाकडे आशेने बघणार्या शेतकर्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. शासनाने भुईमुगाची आधारभूत किंमत ४ हजार रुपये ठेवली असताना नाफेडकडून अद्याप खरेदीच सुरू करण्यात आली नाही. खरीप हंगाम तोंडावर आल्याने आता शेतकर्यांना त्यांचा भुईमूग कवडीमोल भावाने व्यापार्यांना विकावा लागत आहे. भुईमुगाची नाफेडची आधारभूत किंमत ४ हजार रुपये असताना शेतकर्यांना २५00 ते २७00 रुपये क्विंटलने त्यांचा माल व्यापार्यांना विकावा लागत आहे. क्विंटलमागे १५00 ते १७00 रुपये नुकसान शेतकर्यांना सहन करावा लागत आहे, ते केवळ नाफेडची खरेदी बंद असल्यामुळे. नाफेडने शेतकर्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता यापूर्वी हरभरा खरेदी बंद केली होती. आता भुईमुगाची खरेदी सुरू न केल्याने शेतकर्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
नाफेडकडून जिल्ह्यात भुईमुगाची खरेदीच नाही!
By admin | Updated: June 2, 2014 01:36 IST