शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम पर्सनल लॉ रद्द करण्याचा डाव

By admin | Updated: October 22, 2016 02:46 IST

तहफ्फुजे कानुने शरीअत कमिटीचा आरोप; शासनाच्या निषेधार्थ २३ ला सभा.

अकोला, दि. २१- मुस्लीम पर्सनल लॉ हा देशातील २५ कोटी मुस्लीम जनतेच्या धर्माचा हा विषय आहे मात्र तो संपविण्याचा केंद्र शासनाचा डाव असल्याचा आरोप करीत शासनाचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता जाहीर निषेध सभा आयोजित केली आहे. अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेतून तहफ्फुजे कानुने शरीअत कमिटीतर्फे देण्यात आली.तलाक पद्धत नाहीशी करण्यासाठी केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या भारतीय राज्यघटनेत प्रत्येक धर्माला त्याच्या रूढी परंपरा जोपासण्याचा अधिकार दिला आहे. त्यात बदल करणे म्हणजे, बहाल केलेल्या धार्मिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आणि त्यात ढवळाढवळ करण्याचा हा प्रयत्न आहे. असे झाल्यास ती धोक्याची घंटी ठरेल. शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी ही सभा आयोजिली असून, याला मुफ्ती अब्दुल रशीद, मौलाना जब्बार, मुफ्ती मोहमत अशफाक आदी संबोधित करतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. समान नागरी कायद्यासंदर्भात लॉ कमिशनने जे प्रश्न उपस्थित करून जी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, त्याचा संपूर्ण समाज निषेध करीत आहे. धार्मिक कायदे नष्ट करून देशाची प्रगती होणार नाही. मुस्लीम पर्सनल लॉ म्हणजे कुराणातील भाग आहे. केंद्र शासनाने याचिका मागे घेऊन मुस्लीम धर्माचा आणि संविधानाचा आदर करावा, असेही या पत्रकार परिषदेतून आवाहन केले गेले. या पत्रकार परिषदेला मौलाना मुफ्ती अब्दुल रशीद यांच्यासह सफदरखान कासमी, मुफ्ती गुलाम मुस्तफा, हाफीज मकसूद अहमद, मौलाना मोहमद ताहेर मजेहीदी, मो. वसीम आदी कानुने शरीअत कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. कचरा निर्मूलनासाठी आवाहन२३ ऑक्टोबरच्या एसीसीमधील जाहीर सभेत मोठय़ा संख्येने उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे पाणी पाउच आणि खाद्यपदार्थांच्या कागदाचा कचरा होण्याची शक्यता लक्षात घेता, सभेत सहभागी होणार्‍यांना सोबत कचरा निर्मूलनासाठी पिशवी आणावी, असे आवाहनही येथे करण्यात आले.