शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शहरात तयार करणार ‘रिचार्ज शाफ्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:19 IST

मागील काही वर्षांपासून महापालिका क्षेत्रात भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी हाेत चालली आहे़ परिणामी सबमर्सिबल पंप, कूपनलिकांसाठी किमान ...

मागील काही वर्षांपासून महापालिका क्षेत्रात भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी हाेत चालली आहे़ परिणामी सबमर्सिबल पंप, कूपनलिकांसाठी किमान शंभर ते दाेनशे फुटांपेक्षा अधिक खाेदकाम केल्यानंतरच पाण्याचे स्राेत आढळून येत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे़ ही धाेक्याची घंटा लक्षात घेता महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी शहरात विविध ठिकाणी ‘रिचार्ज शाफ्ट’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे़ तसे पत्र भूजल सर्वेक्षण विभागाला देण्यात आले आहे़

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात दैनंदिन पाण्याचा माेठ्या प्रमाणात वापर केला जाताे़ यामध्ये पाण्याची नासाडी हाेण्याचे प्रमाण माेठे आहे़ पावसाचे वाहून जाणारे पाणी, छतावरील पाणी तसेच घरगुती वापरातील सांडपाण्याचे पुनर्भरण करणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्याचे परिणाम शहरवासीयांना भाेगावे लागत आहेत़ मागील काही वर्षांत शहरातील संत तुकाराम चाैक परिसर, मलकापूर, काेठारी वाटिका, खडकी, जिल्हा परिषद काॅलनी, श्रद्धा काॅलनी, जठारपेठ परिसर, सातव चाैक परिसरासह विविध भागांतील सबमर्सिबल पंप, कूपनलिकांची भूजल पातळी कमी हाेत चालली आहे़ जलपुनर्भरणाची जबाबदारी सामूहिक असून, याचा नागरिकांना विसर पडल्याचे दुर्देवी चित्र आहे़ दरम्यान, ही बाब ध्यानात घेता महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात ‘रिचार्ज शाफ्ट’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे़ तसे पत्र भूजल सर्वेक्षण विभागाला देण्यात आले असून, या विभागाद्वारे शहरात सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती आहे़

३ काेटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी

भूजल सर्वेक्षण विभागाकडून अत्यंत नियाेजनबद्धरीत्या तयार केल्या जाणाऱ्या ‘रिचार्ज शाफ्ट’साठी मनपा प्रशासनाने ३ काेटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी सुरू केली आहे़ मनपाला प्राप्त १५ व्या वित्त आयाेगातून हा निधी प्रस्तावित केला जाईल़ त्यासाठी भूजल विभागाकडून शहरात सर्व्हे केला जाणार आहे़

सत्ताधाऱ्यांची सहमती

दिवसेंदिवस भूजल पातळीत घसरण हाेत चालली असून, ही चिंतेची बाब लक्षात घेता प्रशासनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपने तातडीने सहमती दिली आहे़ या कामासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे़