शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून माना परिसरात वृक्षांची कत्तल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:19 IST

मूर्तिजापूर : तालुक्यातील माना वीज वितरण माना उपविभाकडून मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु, माना सबस्टेशन ...

मूर्तिजापूर : तालुक्यातील माना वीज वितरण माना उपविभाकडून मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु, माना सबस्टेशन अंतर्गत येत असलेल्या माना गावातील १८ मे रोजी चार महाकाय कडुलिंबाच्या झाडांची बुंध्यापासून कत्तल करण्यात आली असल्याने गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

माना सबस्टेशन अंतर्गत वीज तारांजवळ असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून तारांजवळची जागा मोकळी करण्याचा कार्यक्रम चालू असताना त्यांनी तसे न करता मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या न छाटता शंभर-दोनशे वर्षांपूर्वीचे चार कडुनिंबाचे झाडे बुंध्यापासून जमीनदोस्त केली. शासन एकीकडे वृक्ष लागवडीची मोहीम युद्धपातळीवर राबवीत असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विनापरवाना महाकाय वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात माना वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता कमलेश मस्के यांना व मूर्तिजापूर येथील उपकार्यकारी अभियंता मनोज खांडरे यांना यासंदर्भात विचारणा केली असता, आम्हाला माहिती नसल्याचे सांगत, त्यांनी कानावर हात ठेवले. वास्तविक मान्सूनपूर्व नियोजन म्हणून झाडाच्या फांद्या छाटणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून संपूर्ण झाडाची कत्तल होत असल्याने माना येथील उपसरपंच मंगेश वानखडे यांनी तहसीलदार मूर्तिजापूर व पोलीस स्टेशन माना येथे वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कुठलीही परवानगी न घेता झाडाची कत्तल करणे गंभीर बाब असून, या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.

फोटो:

मान्सूनपूर्व तयारी करताना आम्ही झाडे बुंध्यापासून तोडत नाही. केवळ झाडाच्या फांद्या छाटण्यात येतात. वृक्षांची कत्तल केली असेल तर त्याची चौकशी करू.

-मनोज खांडरे,

उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी,

महावितरण कंपनीने वृक्ष तोडण्यापूर्वी ग्रामपंचायत व वनविभागाची परवानगी घेणे अपेक्षित आहे. तलाठी, मंडळ अधिकारी यांचा पंचनाम्यासह अहवाल मागवून वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल.

-प्रदीप पवार

तहसीलदार, मूर्तिजापूर