शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात खटला दाखल करण्याच्या हालचाली

By admin | Updated: February 3, 2015 00:36 IST

कॅल्शियम कार्बाइडने आंबा पिकविल्याचे प्रकरण, लोकमतने उघडकीस आणला होता प्रकार.

अकोला - जिल्ह्यातील काही कोल्ड स्टोरेजमध्ये आंबा कॅल्शियम कार्बाइडच्या साह्याने पिकविला जात असल्याचे प्रकरण मे २0१४ मध्ये ह्यलोकमतह्णने उघडकीस आणले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने बाळापूर येथून सुमारे २ हजार ७९६ किलो आंबा जप्त करून तो नष्ट केला होता. या प्रकरणी खटला आता न्यायालयात दाखल करण्याच्या हालचाली अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू आहेत. ह्यलोकमतह्णच्या वृत्तानंतर ही जम्बो कारवाई करण्यात आली असून, तिघांविरुद्ध न्यायालयात खटलाही या आठवड्यात दाखल करण्यात येणार आहे, हे विशेष. बाळापूर नजीकच्या बाभूळखेड शिवारामध्ये असलेल्या एका कोल्ड स्टोरेजमध्ये हजारो किलो आंबा कॅल्शियम कार्बाइडने पिकविण्यात येत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी २ मे २0१४ रोजी छापा टाकत तब्बल १३ टन आंब्याचा साठा जप्त केला होता. सदर आंब्याचा साठा कॅल्शियम कार्बाइडने पिकविला जात असल्याचे समोर आल्यानंतर हा साठा नष्टही करण्यात आला होता. दर तिसर्‍या दिवशी अकोला जिल्ह्यात तब्बल ८ ते १0 ट्रक आंबे कर्नाटक येथून आणण्यात येत असत. त्यानंतर या आंब्यावर प्रक्रिया करून कच्चे आंबे पिकविले जात होते. कॅल्शियम कार्बाइडने हे आंबे पिकविले जात असल्याने आणि यामध्ये फॉस्फरस व आर्सेनिक यासारखे घातक रासायनिक घटक असल्याने ते यकृत आणि किडणीसह हृदयावर गंभीर परिणाम करणारे असल्याचे ह्यलोकमतह्णने समोर आणले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दक्षता पथकाच्या सहआयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. ह्यलोकमतह्णच्या वृत्तानंतर अमरावती येथील दक्षता पथक आणि अकोला येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी बाळापूर परिसरात छापेमारी करीत सुमारे १३ टन आंब्याचा साठा जप्त करून तो नष्ट केला होता. त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रकरणात न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी पूर्ण केली असून, या आठवय़ातच हा खटला न्यायालयात उभा राहणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात तीन आरोपींचा समावेश असून, त्यांनी आंबा कॅल्शियम कार्बाइडने पिकवून नागरिकांच्या जिवाशी खेळ केल्याची माहितीही एका अधिकार्‍याने दिली.