शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकार्‍यांच्या अटकेसाठी हालचाली

By admin | Updated: August 15, 2014 01:41 IST

अकोला जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागातील जनरेटर घोटाळा; एसीबीने लावली राज्यभर ‘फिल्डिंग’

अकोला : एकात्मिक आदिवासी विकास विभागातील लाखो रुपयांच्या जनरेटर घोटाळ्यातील आरोपी अप्पर आयुक्त आणि प्रकल्प अधिकार्‍यांच्या अटकेसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी अकोला एसीबीने त्यांच्या पाच जिल्ह्यातील कार्यालयांना आरोपींच्या अटकेसाठी गुरुवारी फॅक्स पाठविले. २0१0-११ साली विदर्भ वैधानिक विकास मंडळातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी २0 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या अमरावती येथील अप्पर आयुक्तांच्या अखत्यारित अकोला, धारणी आणि पांढरकवडा येथील एकात्मिक विकास अधिकारी कार्यालये येतात. या कार्यालयांतर्गत येणार्‍या आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी जी.एस. एंटरप्राईजेसकडून एकूण ५0 जनरेटर खरेदी करण्यात आले. या खरेदी प्रक्रियेबाबत तक्रार झाल्यानंतर अकोला एसीबीने चौकशी केली. तिन्ही प्रकल्प कार्यालयांतर्गत राबविण्यात आलेल्या खरेदी प्रक्रियेत एकूण ६६ लाख ९८ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे या चौकशीतून स्पष्ट झाले होते. याप्रकरणी अकोला, धारणी आणि पांढरकवडा येथे अप्पर आयुक्त विश्‍वंभर वरवंटकर, प्रकल्प अधिकारी महेंद्रसिंग माणिकसिंग खोजरे आणि जी.एस. एंटरप्राईजेसचा मालक शब्बीर अली मोहम्मद अली, पांढरकवडा येथील तत्कालीन प्रकल्प अधिकारी सारंग कोंडलकर यांच्याविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. असा झाला घोटाळा.. एकात्मिक आदिवासी विकास विभागाने औरंगाबाद येथील युनायटेड जनसेट या कंपनीशी दर करार केला. या कंपनीने जनरेटर पुरवठय़ासाठी मुंबई येथील जी.एस. एंटरप्राईजेसची नेमणूक केली. त्यानंतर खरेदीसाठी प्रकल्प कार्यालयाने जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी घेतली. यासाठी कंपनीची बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली. दर करारामध्ये प्रती संच १ लाख ७९ हजार ३२ रुपये किंमत असतानाही २ लाख २२ हजार ९८0 रुपये या दराने संच खरेदी करण्यात आले. एक आरोपी मंत्रालयात ओएसडी..जनरेटर घोटाळ्यातील आरोपींमध्ये पांढरकवडा येथील तत्कालीन प्रभारी प्रकल्प विकास अधिकारी सारंग कोंडलकरचाही समावेश आहे. कोंडलकर हा उपविभागीय अधिकारी होता. तो सध्या विधानसभा उपाध्यक्ष आमदार वसंत पुरके यांचा ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) आहे. एसीबीच्या अकोला युनिटने आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू झाल्याने सर्वांचेच धाबे दणादणले आहेत.खोजरे यापूर्वीच्याही गुन्ह्यात आरोपीएकात्मिक आदिवासी विकास विभागातील लाखो रुपयांच्या जनरेटर घोटाळ्यातील आरोपी प्रकल्प अधिकारी महेंद्रसिंग माणिकसिंग खोजरे हा २0१३ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातीलही आरोपी आहे. वन्य प्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी सौर उर्जेवर आधारित कुंपणाची योजना राबविण्यात आली होती. या योजनेत ३८ लाख ५३ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचे उजेडात आले होते. खोजरे हा सहाय्यक वनसंरक्षक पदावर कार्यरत होता.