शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मोर्णा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 10:36 IST

या प्रकल्पांमध्ये जवळपास ८८ दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध झाला आहे.

पातूर : तालुक्यातील सर्वात मोठा मोर्णा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. निर्गुणा प्रकल्प वगळता तालुक्यातील आठ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. या प्रकल्पांमध्ये जवळपास ८८ दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध झाला असून, यंदा १३ हजार ५८६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला मोर्णा सिंचन प्रकल्प सलग दुसºया वर्षी १०० टक्के भरला आहे. सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. प्रकल्पात ४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पावर मोर्णा डावा कालवा येथून १३२१ हेक्टर, वरखेड उन्नई बंधारा येथून ४ हजार हेक्टर, असे एकूण ५ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावरील सिंचन अपेक्षित आहे. तसेच या प्रकल्पातून पातूर शहरात नळ योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच देऊळगाव, पास्टुल नळ योजना कार्यान्वित होण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. निर्गुणा सिंचन प्रकल्पात सध्या ७६ टक्के जलसाठा असून, या प्रकल्पावर ५,८३६ हेक्टर क्षेत्रावर सिंचन केल्या जाते. तसेच पातूर सिंचन तलाव शंभर टक्के भरला आहे. यातून ३०० हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. तसेच तुळजापूर सिंचन प्रकल्पावर १५० हेक्टर क्षेत्र, मळसूर येथील विश्वमित्र प्रकल्प शंभर टक्के भरला असून, यावर १,८०० ते २,००० हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. उमरा पांगरा रस्त्यावरील हिवरा संग्राहक तलावर ३०० हेक्टर क्षेत्र सिंचन केले जाते. जरंडी येथील प्रकल्पावर ३०० सिंचन केले जाते. गावडगाव येथील प्रकल्पावर सुमारे १५० हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाते. शेतकरी रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका तसेच उन्हाळी पिके घेतात. तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील सर्व सिंचन प्रकल्पाच्या जलसाठ्यावर पाटबंधारे उपविभाग क्रमांक १ उपविभागीय अधिकारी अनिल राठोड आणि शाखा अभियंता गजानन अत्तरकार हे लक्ष ठेवून आहेत.

४८ तासानंतर महान धरणाचे गेट बंद!महान धरणाच्या अतिरिक्त जलसाठ्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. १४ आॅगस्ट रोजी दोन गेट एक फुटाने उघडण्यात आले होते. ४८ तासानंतर रविवारी सकाळी ७.१५ वाजता गेट बंद करण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण