शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पीआरसीची दहशतच जास्त

By admin | Updated: December 2, 2015 02:41 IST

शासनाने पीआरसी रद्द करावी, आ. श्रीकांत देशपांडे यांचे मत, ९, १0 डिसेंबर रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन.

शेगाव (बुलडाणा): पंचायती राज समितीचा (पीआरसी) धाक कमी आणि दहशतच जास्त असून, शासनाने ही समितीच रद्द करावी असे मत आ. श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. अमरावती जिल्ह्यातील मुख्याध्यापक नकाशे यांच्या आत्महत्याप्रकरणी नियमानुसार आमदारांवर गुन्हे दाखल करायलाच हवे, अशी मागणीही त्यांनी केली. विविध मागण्यांसाठी मंगळवारी शेगाव येथून आ. श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या पायदळ दिंडीला सुरुवात झाली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह येथील शाळेला पंचायत राज समितीच्या सदस्यांनी भेट दिल्यानंतर, या शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी तणावातून शाळेतच आत्महत्या केली. नकाशे हे परिस्थितीचे बळी ठरले आहेत. पंचायत राज समितीची दहशत पसरली असून, ही समितीच रद्द होणे गरजेचे आहे. इतर तक्रारींवर होणार्‍या कारवाईप्रमाणे या तक्रारीवरही गुन्हे दाखल होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षकांच्या पायदळ दिंडीबाबत बोलताना शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आ. कपिल पाटील, आ. विक्रम गाळे यांनी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालणार्‍या विमुक्त जाती, भटक्या जमाती कनिष्ठ महाविद्यालयांवर आणि विनाअनुदानीत शाळांवर काम करणार्‍या प्राध्यापक आणि शिक्षकांची अवस्था दयनीय झाली असल्याचे सांगून, त्यांना तात्काळ अनुदान उपलब्ध करुन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. आरएसएस आणि भाजपाचा गढ असलेल्या नागपुरात गल्लोगल्लीत शिक्षक भिक मागणार आहेत. तरीही शासनाला दया आली नाही, तर सभागृह बंद पाडू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यासाठी ९ व १0 डिसेंबर रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन करणार असून शासनाने मागण्या मान्य केल्या नाही, तर बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, विभाग अध्यक्ष सय्यद राजिक, पद्माकर इंगळे आदी उपस्थित होते.