शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोर्णेच्या पुराचा अतिक्रमकांना धोका!

By admin | Updated: July 8, 2016 02:12 IST

नदीपात्रात बांधली घरे; अकोला महापालिकेच्या पत्राला अतिक्रमकांचा ठेंगा.

अकोला: मोर्णा नदीच्या काठावर आणि चक्क नदी पात्रात अतिक्रमकांनी पक्की घरे उभारली आहेत. अशा घरांना पावसाळ्य़ात पुराचा धोका लक्षात घेता अतिक्रमकांनी तातडीने घरे रिकामी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने दिला होता. प्रशासनाच्या पत्राला ठेंगा दाखवत एकाही अतिक्रमकाने घर सोडले नसल्याचे चित्र समोर आले आहे.कधीकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणार्‍या मोर्णा नदीची अकोलेकरांनीच दुरवस्था केली आहे. सद्यस्थितीत शहरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोर्णा नदीचा वापर सुरू आहे. संपूर्ण शहरातील घाण, सांडपाणी मोर्णा नदीच्या पात्रात सोडल्या जाते. यामुळे नदीच्या काठावर प्रचंड घाण साचली असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही अतिक्रमकांनी नदीच्या काठावर तर अनेकांनी चक्क नदी पात्रात मातीचे भराव घालून पक्की घरे उभारली आहेत. ही बाब कमी म्हणून की काय, नदी पात्रात वीटभट्टय़ादेखील उभारण्यात आल्या. या प्रकारामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून प्रदूषणाला हातभार लागत असल्याचे चित्र आहे. नदी पात्रात माती व मुरुमाचे भराव घालून पक्की घरे उभारण्याचा सपाटा अतिक्रमकांनी लावल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्य़ात पुराचा धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी नदीच्या काठावरील आणि नदी पात्रातील अतिक्रमकांना तातडीने घरे रिकामी करण्याचे फ र्मान जारी केले होते. प्रशासनाच्या सूचना वजा आदेशाला अतिक्रमकांनी ठेंगा दाखवला असून नदी पात्रातील अतिक्रमण कायम असल्याचे चित्र आहे.