शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा लांबला; शेतक-यांची घालमेल!

By admin | Updated: June 13, 2016 01:54 IST

बियाणे बाजारात पुन्हा संभ्रमावस्था; मशागतीच्या कामांना ‘ब्रेक’

अकोला: यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज सुरुवातीला सर्वच हवामानशास्त्र संस्थांनी वर्तविला आहे; परंतु नवीन अंदाजानुसार मॉन्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात येत असल्याने चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जिवाची घालमेल सुरू झाली आहे. त्याचे परिणाम मशागत व बियाणे बाजारावर दिसून येत आहेत. मागील आठवड्यात आलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला होता, आता तर पाऊस नाही आणि तापमानही वाढले आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तर या सर्व पृष्ठभूमीवर आपत्कालीन पीक पेरणीचे नियोजन केले आहे.विदर्भात गत १0 ते १५ वर्षांपासून सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. कृषी विकासाचा दर शून्यावर आला असून, शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी उत्तम पावसाचे संकेत सर्वच हवामानशास्त्र विभाग, खासगी संस्थांनी दिल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या; परंतु पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांच्या जिवाची घालमेल वाढली आहे. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी सरसावलेला शेतकरीसुद्धा ह्यवेट अँड वॉचह्णच्या भूमिकेत आहे. शेतकरी दरवर्षी पावसाळ्य़ापूर्वी बी-बियाणे, खते खरेदी करतो. यावर्षी मात्र बियाणे खरेदीस शेतकरी तयार नसल्याचे बाजारातील चित्र आहे. विदर्भात ३0 जूननंतर सार्वत्रिक पावसाला सुरुवात झाल्यास, मुगाचे पेरणीबाबत शेतकरी फेरविचार करीत असतो.दरम्यान, कृषी विद्यापीठाने यावर्षी वेळेवर मॉन्सून येत असल्याचा अंदाज बघून, पीक पेरणीचे नियोजन केले आहे; परंतु मॉन्सून ३0 जूनपर्यंत आला नाही, तर खरिपातील काही पिकांमध्ये बदल करावा लागेल. खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते; मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी याच आठवड्यात होणे आवश्यक असते. तथापि, नियमित पावसाळा दोन आठवडे उशिराने सुरू झाल्यास कृषी विद्यापीठाने पीक पेरणीसाठी काही सूचना केल्या आहेत. पश्‍चिम विदर्भात अडीच लाख क्विंटल विविध पिकांचे बियाणे बाजारात आले आहे. परंतु खरेदी वाढली नसल्याने बियाणे विक्रेते शेतकर्‍यांची प्रतीक्षा करताना दिसत आहेत.