शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वत्र मान्सून पोहोचला !

By admin | Updated: June 25, 2015 23:55 IST

पश्‍चिम व-हाडातील शेतक-यांना दमदार पावसाची प्रतीक्षा.

अकोला : यंदा मान्सून सर्वत्र पोहोचला; पण पश्‍चिम विदर्भात तीन जिल्हय़ात अपेक्षित पाऊसच नाही. सलग पाच वर्षापासून या भागात ही परिस्थिती असून, चांगल्या पावसाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे भाकीत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. विदर्भात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन होत असते. नागपूर मध्यभागी असल्यामुळे अरबी व बंगाल या दोन्ही उपसागराकडून येणार्‍या मान्सूनचा फायदा विदर्भाला होत असतो. म्हणजेच या दोन्ही उपसागराकडून येणारा मान्सून विदर्भात बरसतो. असे असले तरी बंगालच्या उपसागराकडून येणार्‍या मान्सूनचा जोर हा अधिक असतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणूनच अरबी समुद्राकडून येणार्‍या पावसाच्या दुप्पट पाऊस बंगालच्या उपसागराकडे तयार झालेल्या मान्सून प्रणालीकडून विदर्भाला मिळतो; परंतु यावर्षी या दोन्हीकडून येणारी मान्सून प्रणाली अशक्त असल्याने पश्‍चिम विदर्भातील अकोला व बुलडाणा जिल्हय़ात पावसाचे चित्र सध्या तरी अस्पष्ट आहे. यावर्षीच्या पावसावर एल-नीनोचा प्रभाव राहील, असे हवामनशास्त्र विभागाकडून सांगितले जात होते. तथापि, यंदा वेळेवर पाऊस सुरू झाला आहे; पण राज्यातील १२ जिल्हय़ात 0 ते २५ टक्केच पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून कोकणाचा भाग वगळता पावसाने उघडीप दिली आहे. वर्‍हाडात मात्र चार दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असून, उकाड्यात वाढ होताना दिसत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागानेदेखील तीन ते चार दिवस मान्सूनच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याचे स्पष्ट केले आहे; पण येत्या दोन-तीन दिवसात पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.