लोकमत न्यीज नेटवर्कहिवरखेड: नजीकच्या सदरपूर येथे दोन विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना २६ ऑगस्टच्या रात्री घडल्या. या प्रकरणी पीडित महिलांच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरपूर येथील एक विवाहित महिला २६ ऑगस्ट रोजी घरामध्ये एकटी झोपली असता आरोपीने घरात घुसून तिचा विनयभंग केला. सदर पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पंजाब मेतकर याच्याविरुद्ध भादंवि ४५२, ३५४(अ) ३५४ (ब), ३२३, ५0४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रमाणेच सदरपूर येथील दुसर्या घटनेमध्ये विवाहिता २६ ऑगस्ट रोजी घरात असताना आरोपीने तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग व तिच्या पतीस शिवीगाळ केली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश सुरेश मेतकर याच्याविरुद्धगुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पांडुरंग राऊत, भगत करीत आहेत.
दोन विवाहितांचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:10 IST
हिवरखेड: नजीकच्या सदरपूर येथे दोन विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना २६ ऑगस्टच्या रात्री घडल्या. या प्रकरणी पीडित महिलांच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरपूर येथील एक विवाहित महिला २६ ऑगस्ट रोजी घरामध्ये एकटी झोपली असता आरोपीने घरात घुसून तिचा विनयभंग केला.
दोन विवाहितांचा विनयभंग
ठळक मुद्देसदरपूर येथील घटना पतीलाही केली शिवीगाळ