कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलपासून कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. उद्योग व्यवसायांना घरघर लागली आहे. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण या दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असताना महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीजबिल पाठवून शॉक दिला आहे. या भरमसाठ वीजबिल दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने सोमवारी विद्युत भवनासमोर वीजबिलाची होळी करण्यात आली. वीजबिल माफी झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली अकोल्यातील जनतेने वीजबिल भरू नयेत. आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे म्हणाले. वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्यास येऊ नये. कर्मचारी वीज कापण्यास आल्यास मनसैनिक त्यांना सामोरे जातील. त्यानंतर काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी सरकारची असेल, असा स्पष्ट इशारा मनसे सैनिकांनी दिला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, मनकासेचे सौरभ भगत, राजेश काळे, अरविंद शुक्ला, आदित्य दामले, राकेश शर्मा, राजेश पिंजरकर, दुर्गा भरगड, चंद्रकांत अग्रवाल,अनुज तिवारी, आयुष देशमुख, गोपाल पाथ्रीकर, आशिष गुल्हाने, विजय भोसले, मनोज बोपटे, मंगेश देशमुख, शुभम कावोकार, प्रवीण फुलसावंगेकर, प्रथमेश गावंडे, संजय राठोड, कृष्णा हिवरकर, सागर बावस्कर, पुरुषोत्तम चौधरी, आकाश शेजे आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
मनसेने केली विजबिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST