शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर बलात्कार करणारा पोलीस गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका ४२ वर्षीय पोलीस कर्मचाºयाने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आॅक्टोबर २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत  बळजबरीने बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघड झाला. सदर अल्पवयीन मुलीने तिच्या सोबत घडलेल्या या घटनेची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात केल्यानंतर  पोलिसांनी संदीप आनंद ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका ४२ वर्षीय पोलीस कर्मचाºयाने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आॅक्टोबर २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत  बळजबरीने बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघड झाला. सदर अल्पवयीन मुलीने तिच्या सोबत घडलेल्या या घटनेची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात केल्यानंतर  पोलिसांनी संदीप आनंद गवई या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गीता नगरातील रहिवासी पोलीस कर्मचारी संदीप गवई याने केलेल्या कुकृत्याची तत्काळ दखल घेत जुने शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब घुगे यांनी त्याला अटक केली. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, संदीप गवई याने २०१६ च्या दसºयाच्या दिवशी घरी बोलावले. व मोबाइल नंबर दिला. मला नेहमी फोन करीत राहा, असे म्हटले. जर तू फोन केला नाही, तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन, अशी धमकीही दिली. तेव्हापासून तो सतत बोलत असे . दिवाळीनंतर आई मामाच्या घरी गेल्यानंतर त्याने घरी कुणी नसल्याचे पाहून बोलावले व बलात्कार केला. त्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा त्याने बलात्कार केला. मी शाळेत जायची, तेव्हा तो पाठलाग करायचा व जवळ करण्याचा प्रयत्न करीत होता; मात्र त्याला टाळण्याचा प्रयत्न करायची. दरम्यान,४ जुलै रोजी आरोपीने रात्री आई घरी असताना त्यांने मला आवाज दिला. एवढ्या रात्री कशाला हाक मारली म्हणून आईने विचारले असता, मी आजपर्यंतचा घडलेला प्रसंग सांगितला. हे ऐकून आईच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनतर तिने मुलीला घेऊन जुने शहर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिसांनी गवई या आरोपीविरुद्ध भादंवि ३७६, ३५४ (ड) ५०६ सहकलम ४ पास्कोनुसार गुन्हा दाखल केला.खाकीतील रक्षक बनला भक्षक!स्वत:च्या मुलीच्या वयाच्या असलेल्या मुलीवर बलात्कार करणारा हा खाकी वर्दीतील संदीप गवई भक्षक बनल्याच्या प्रतिक्रिया पोलीस ठाण्यात उमटल्या. मुलीला पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. पोलिसाच्या दहशतीने मुलीच्या मनात प्रचंड भीती असल्याचे दिसून आले.