शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाच्या रॉयल्टीवर तोडगा निघेना!

By admin | Updated: December 17, 2015 02:15 IST

राज्यभरात खाण व क्रशर उद्योजकांचा बंद सुरुच.

अकोला : महाराष्ट्र शासनातर्फे गौण खनिजावर वाढविण्यात आलेल्या शंभर टक्के रॉयल्टी विरोधात महाराष्ट्र राज्य खाण व क्रशर उद्योजकांतर्फे गत महिनाभरापासून नागपूर अधिवेशनावर बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. परंतु, अद्यापही यावर ठोस तोडगा निघत नसून, केवळ तोंडी आश्‍वासनांवर त्यांची बोळवण करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने १0 मे २0१५ पासून गौण खनिजावरील रॉयल्टी १00 टक्क्यांनी वाढवली आहे. परिणामी गौण खनिजांच्या किमती प्रचंड वाढल्या असून, आतापर्यंत २00 रुपये ब्रासप्रमाणे मिळणारे गौण खनिज ३00 रुपये ब्रास याप्रमाणे मिळत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात महाराष्ट्र खाण व क्रशर उद्योजक संघाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून राज्यभरात टप्प्याटप्प्यानी बंद पुकारण्यात आला. गौण खनिजावर दुपटीने वाढविण्यात आलेली रॉयल्टी कमी करण्याच्या मागणीसाठी खाण व क्रशर उद्योजकांचे नागपूर हिवाळी अधिवेशनावर बेमुदत आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून, विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला. परंतु, यावर अद्यापही ठोस तोडगा निघाला नसल्याने खाण व क्रशर उद्योजकांचा बेमुदत बंद कायम राहणार असल्याचे खाण व क्रशर उद्योजक संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे. गौण खनिजावरील रॉयल्टी कमी करण्यासंदर्भात खाण व क्रशर उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून, मुख्यमंत्र्यांनी १00 रुपयांनी रॉयल्टी कमी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. परंतु, जोपर्यंत लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत बंद कायम राहणार असल्याचे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष नवीन खोसला यांनी स्पष्ट केले. १00 रुपयांनी रॉयल्टी कमी होण्याची शक्यता खाण व क्रशर उद्योजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान गौण खनिजावरील रॉयल्टी १00 रुपयांनी कमी करण्याचे आश्‍वासन बुधवारी मुख्यमंत्र्यांनी दिले. परंतु, हे केवळ तोंडी आश्‍वासन असल्याने खाण व क्रशर उद्योजकांनी आंदोलन सुरू ठेवत लेखी आश्‍वासनाची मागणी केली आहे.