शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मिड ब्रेन अँक्टिवेशन फसवणूकच - वाघ

By admin | Updated: April 25, 2015 02:19 IST

अंनिसचा दावा; २१ लाखाचे बक्षीस जाहीर

बुलडाणा: मिड ब्रेन अँक्टिवेशन, सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट नावाखाली सुरू असलेला प्रकार ही शुद्ध फसवणूकच आहे. या फसवणुकीपासून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबली पाहिजे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक किशोर वाघ यांनी पत्रकार परिषदेत केले. येथील बुलडाणा अर्बनच्या सहकार सेतु सभागृहात अंनिसने पत्रकार परिषद घेऊन हे प्रशिक्षण विज्ञानाच्या आधारे नसून पालक व बालकांची फसवणूक असल्याचा दावा त्यांनी केला. डोळ्यावर पट्टी बांधून मिड ब्रेन सुपर सेन्समुळे बालकांना आपोआप दिसते. रंग, नोटांचे नंबर ओळखणे, वाचन करणे, वाहन चालविणे असे डेमो दाखवून चमत्कारिक दावे केले जातात. यालाच भारतीय परंपरेमध्ये दिव्यदृष्टी असे म्हणतात. प्रत्यक्षात जगाच्या पाठीवर अशी दिव्यदृष्टी कोणालाही प्राप्त झाली नसून, हे सर्व थोतांड आहे. स्मरणशक्ती वाढणे, एकाग्रता वाढणे अशा भूलथापा देऊन आयोजक व त्यांचे प्रशिक्षक मिड ब्रेन अँक्टीवेशनचे प्रशिक्षण घेऊन मुलांमध्ये चमत्कारिक शक्ती निर्माण झाली, असे भासवतात. अशा चमत्कारिक प्रशिक्षणातून मुलांमध्ये मेहनतीतून उत्तम मार्क मिळवावे लागतात, यावरचा विश्‍वास उठतो व त्याचे पुढील शैक्षणिक आयुष्य बेकार होते. पुढे हेच विद्यार्थी अपयशाने खचून जावून त्यांना नैराश्य येते. दरम्यान, डोळ्यावर पट्टी बांधून मिड ब्रेन सुपरसेन्समुळे नोटांचे नंबर ओळखणे, पुस्तक वाचने, वाहन चालविणे हे अंनिसच्या तज्ज्ञ समितीसमोर सिद्ध केल्यास अशा व्यक्तीला २१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे यावेळी किशोर वाघ यांनी सांगितले.