शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:23 IST

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय? नीट परीक्षा होण्याच्या आधी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे केंद्राची नीट ...

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

नीट परीक्षा होण्याच्या आधी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे केंद्राची नीट परीक्षा नकोच, अशी भूमिका तामिळनाडू राज्यातील विद्यार्थी, पालक व तेथील सत्ताधारी सरकारने घेतली. नीट परीक्षेतून राज्यातील सूट देणारे विधेयक तामिळनाडू सरकारने विधानसभेत मांडले आणि संमतही केले. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा देण्याची गरज नाही. या विधेयकाद्वारे विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट मिळण्याची मागणी तामिळनाडू सरकारने केली आहे.

शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात,

पूर्वी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्यात येत होते. स्पर्धात्मक परीक्षा नव्हती. नीट व इतर परीक्षांच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश द्यावेत. नीट परीक्षा आवश्यक आहेच. परंतु बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश झाले तर अयोग्य ठरणार नाही. गुणवंत विद्यार्थ्यांचे यात नुकसान व्हायला नको.

-डॉ.विजय नानोटी, प्राचार्य, रालतो विज्ञान महाविद्यालय

नीट लागू झाली तेव्हापासून तामिळनाडू सरकार विरोध करीत आहे. सीईटी व्हायची. राज्यापुरती स्पर्धा व्हायची. नीटमुळे देशभरात विद्यार्थ्यांच्या संधी वाढल्या. १५ टक्के जागा विद्यार्थ्यांच्या वाढल्या. नीट परीक्षेमुळे आता सीईटी, एआयआयएमएस, जेआयपीएमइआर, एआयपीएमटी या परीक्षा द्याव्या लागत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून नीट परीक्षाच योग्य आहे.

-प्रा. ललित काळपांडे, शिक्षण तज्ज्ञ

विद्यार्थी काय म्हणतात,

नीट परीक्षेमध्ये स्टेट बोर्डापेक्षा अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम समाविष्ट असतो. नीट परीक्षेमुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होते. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश व्हावेत.

-ऋषिकेश वहिले, विद्यार्थी बारावी

फोटो:

बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश नकोच. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश मिळावेत. या परीक्षेच्या माध्यमातूनच गुणवंत विद्यार्थी मेडिकलला जातील. बारावीच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले तर गुण आणि आरक्षणाचा गुणवंत विद्यार्थ्यांना फटका बसेल.

-ओजस्वी अविनाश बोर्डे, विद्यार्थिनी बारावी

फोटो:

नीट परीक्षा घेऊनच वैद्यकीय प्रवेश द्यावेत. यातून योग्य व सक्षम विद्यार्थी निवडले जातील. देशाला दर्जेदार डॉक्टर मिळतील. अन्यथा गुणवंत व क्षमता असलेले विद्यार्थी मागे राहतील. वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीतील गुणांचा विचार होऊ नये.

-मानसी सुनील साठे, विद्यार्थिनी बारावी

फोटो: