शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेचे मोजमाप

By admin | Updated: December 6, 2015 02:29 IST

रस्त्यासाठी पाडणार आवारभिंत.

अकोला: शहरातील अशोक वाटिका ते सरकारी बगिचापर्यंंत रस्ता विस्तारीकरणाच्या कामासाठी शनिवारी जिल्हाधिकार्‍यांसोबत महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जागेची पाहणी केली. रस्ता विस्तारीकरणाच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत पाडण्याची ग्वाही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिली. शहरातील रस्ते विस्तारीकरणाच्या कामांमध्ये अशोक वाटिका ते सरकारी बगिचापर्यंंत ३0 मीटर रुंदीच्या रस्त्याचे विस्तारीकरण मनपामार्फत करण्यात येणार आहे. या रस्ता विस्तारीकरणाच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याच्या कामासाठी या कार्यालयाच्या आवारातील ६ मीटर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मनपाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्यासोबत मनपा, भूमिअभिलेख, नगरचना व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारभिंती परिसरातील जागेचे मोजमाप करण्यात आले. यावेळी रस्ता विस्तारीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्याकरिता, जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत पाडण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी मनपाच्या अधिकार्‍यांना दिली. यावेळी मनपाचे शहर अभियंता अजय गुजर, सहाय्यक नगररचनाकार संदीप गावंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पटोकार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ढोणे, मो. युसूफसह पाच उमेदवारांनी घेतले ११ अर्ज अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी एकही अर्ज दाखल झाला नाही. चौथ्या दिवशी माजी आमदार डॉ.जगन्नाथ ढोणे, भारिप- बहुजन महासंघाचे मोहम्मद युसूफ मो.शफी यांच्यासह पाच उमेदवारांनी ११ अर्ज घेतले. ९ डिसेंबरपर्यंंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.