शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी मंडळाचे पथक करणार गैरप्रकाराची चौकशी

By admin | Updated: January 6, 2017 02:36 IST

नोंदणी न करणार्‍यांना नोटिस दिली जाणार; जिल्हाधिका-यांनीही घेतली दखल.

अकोला, दि. ५- रक्ताचे पाणी करून अंगा-खांद्यावर पोत्यांचे ओझे वाहणार्‍या माथाडी कामगारांची नोंद न करता तुटपुंजा मजुरीवर त्यांची बोळवण करणार्‍यांना नोटिस देत नोंदणी न केल्याची विचारणा करण्यात येईल. सोबतच रेल्वे मालधक्क्यावर घडत असलेल्या प्रकाराबाबत माथाडी मंडळाची पथके घटनास्थळावर कामाच्या वेळी प्रत्यक्ष चौकशी करतील, असे अकोला विभागीय माथाडी मंडळाचे अध्यक्ष व्ही.आर. पाणबुडे यांनी सांगितले. कोणत्याही ठिकाणी श्रमजीवी काम करणार्‍यांच्या हिताचे, आरोग्याचे रक्षण करणारा कायदा अकोला जिल्हय़ात कागदावरच उरला आहे. ही बाब ह्यलोकमतह्णने बुधवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाली. यावेळी शिवणी रेल्वेधक्क्यावर एकाच वेळी १८0 कामगार ५८ रॅकमधून धान्याची पोती रिकामी करीत होते. त्यावेळी जड वाहतूक करणारे किमान २२ वाहने धक्क्यावर होती. त्याचवेळी ते धान्य उतरून गोदामात साठा करण्यासाठी १५0 पेक्षाही अधिक माथाडी कामगार राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होते. या दोन ठिकाणची संख्या पाहता ती चारशेच्या जवळपास आहे. त्या कामगारांची कुठेच नोंद नाही, हे उघड झाले. माथाडी मंडळात प्रत्यक्ष ४२ कामगारांची नोंद करण्यात आली. त्यातून दरमहा ४ लाख ५0 हजारांपेक्षाही अधिक रकमेच्या लेव्हीचे नुकसान होत असल्याचेही मांडण्यात आले. माथाडी कायद्यानुसार कामगारांचे कल्याण, आरोग्य आणि इतर सुरक्षिततेसाठी मंडळात नोंद करणे बंधनकारक आहे. माथाडी समस्या निकाली काढणार्‍या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी याकडे लक्ष दिल्यास कामगार कल्याण साधले जाईल, अशी कामगार संघटनेची मागणीही पुढे आली. त्याची दखल घेत अकोला-वाशिम-बुलडाणा विभाग माथाडी मंडळ अध्यक्ष, सहायक कामगार आयुक्त व्ही.आर. पाणबुडे यांनी चौकशी करण्यासाठी पथके, तसेच नोंदणी न केलेल्यांना नोटिस देण्यात येत आहे, असे सांगितले.माथाडी मंडळ अध्यक्षांना कामगारांच्या कामाचे दर निश्‍चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर बैठक घेण्यात येत आहे. त्या बैठकीत रेल्वे मालधक्का, राज्य वखार महामंडळ गोदामात अनोंदीत कामगारांना प्रवेश देणे, त्यांच्या लेव्हीची रक्कम न भरणे, माथाडी कायद्याचे पालन न होणे, यावर सविस्तर अहवाल मागविण्यात येईल. - जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी.