शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत व्यापा-यांकडून ‘रिंगण’ करून शेतमालाची खरेदी!

By admin | Updated: March 24, 2015 00:34 IST

व्यापा-यांकडून शेतक-यांची संगनमताने लुबाडणूक, शेतक-यांची प्रशासकाकडे तक्रार.

अकोला- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणार्‍या शेतमालाची खरेदी करण्यासाठी व्यापारी ह्यरिंगणह्ण करून शेतकर्‍यांची संगनमताने लुबाडणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. शेतकर्‍यांनी याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाकडे शुक्रवारी तक्रार केली असून, अडत्या मंडळाच्या पदाधिकार्‍यांनीही दोषी व्यापार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे. शासनाने शेतमालाचे हमी दर ठरवून दिले असले तरी आजही शेतकर्‍यांना त्यांचा माल विकताना व्यापार्‍यांच्या मर्जीवरच अवलंबून राहावे लागते. व्यापार्‍यांकडून वाटेल त्या प्रमाणे दर आकारून शेतमालाची खरेदी केली जाते. याबाबत यापूर्वी अनेकवेळा तक्रारी होऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. शुक्रवार, २0 मार्च रोजी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर चक्क व्यापार्‍यांनी संगनमताने शेतकर्‍यांचे सोयाबीनचे दर पाडून खरेदी करण्याचा प्रकार घडला. आकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील शेतकरी तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गजानन पुंडकर आणि अकोला तालुक्यातील खरप खुर्द येथील शेतकरी संतोष गोंडचवर यांनी त्यांचे सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणले होते. श्रीयोगीराज ट्रेडर्समध्ये त्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ठेवले होते. यावेळी काही व्यापार्‍यांनी रिंगण करून शेतमाल खरेदीचा प्रकार घडला. या दोन्ही शेतकर्‍यांच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २९00 रुपयांपासून बोली लावण्यास सुरुवात केली आणि ३0२५ रुपयांवर बोली थांबविली. विशेष म्हणजे त्याचवेळी अन्य अडत्यांकडे त्याच प्रकाराच्या सोयाबीनला ३२३0 रुपयांपर्यंत दर देण्यात आले होते. याबाबत शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांकडे विचारणा केली असता व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची टिंगलटवाळी करण्यात आल्याचे पुंडकर आणि गोंडचवर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संगनमत करून शेतकर्‍यांची लुबाडणूक करणार्‍या खरेदीदारांवर कारवाई करण्याची मागणीही शेतकर्‍यांनी केली आहे.