शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

एकच चर्चा... मराठा मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 11:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुंबईतील ९ आॅगस्टच्या राज्यव्यापी मूक मराठा क्रांती मोर्चात अकोल्यातील सकल मराठ्यांना सहभागी करून घेण्यासाठी रविवारी सकाळी महानगराला परिक्रमा घालणारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगवा ध्वज फडकावित निघालेली हजारो मोटारसायकलींची रॅली दोन ओळींच्या शिस्तीत पार पडली. हातात आवाहनाचे फलक झळकावित निघालेल्या महिला-पुरुषांच्या निश:ब्द रॅलीने रविवारी अकोलेकरांचे लक्ष वेधले होते.स्थानिक ...

ठळक मुद्देदुचाकीने दणाणले शहर, विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुंबईतील ९ आॅगस्टच्या राज्यव्यापी मूक मराठा क्रांती मोर्चात अकोल्यातील सकल मराठ्यांना सहभागी करून घेण्यासाठी रविवारी सकाळी महानगराला परिक्रमा घालणारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगवा ध्वज फडकावित निघालेली हजारो मोटारसायकलींची रॅली दोन ओळींच्या शिस्तीत पार पडली. हातात आवाहनाचे फलक झळकावित निघालेल्या महिला-पुरुषांच्या निश:ब्द रॅलीने रविवारी अकोलेकरांचे लक्ष वेधले होते.स्थानिक सिव्हिल लाईन चौकातील जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवनातून रॅलीस प्रारंभ झाला. ओपन जीप, त्यामागे फेटेधारी मोटारसायकलस्वार महिला, आणि दीड हजार  मोटारसायकलस्वार पुरुषांची मोठी रॅली निघाली. चला मुंबई... असा फलक घेऊन निघालेली ही भव्य भगव्या ध्वजांची रॅली सिव्हिल लाइन चौकातून रतनलाल प्लॉट चौक, दुर्गा  चौक, अग्रसेन चौक, टॉवर चौक, मदनलाल धिंग्रा चौक, खुले नाट्यगृह चौक, महापालिक कार्यालयासमोरून गांधीचौक, सिटी कोतवाली चौक, जिल्हा होमगार्ड कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोरून, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरून अशोक वाटिका चौक, जेल चौक, सिंधी कॅम्प, खदान मार्गावरून कौलखेड चौकात पोहोचली. येथून ही रॅली रिंगरोड, तुकाराम चौक, सहकार नगर मार्गाने, पावर हाउससमोरून नेहरूपार्क चौक आणि तेथून पुन्हा सिव्हिल लाइन चौकातून परिक्रमा करून जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवनात पोहोचली. रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान या मोटारसायकल रॅलीचा समारोप झाला.राज्यातील ५७ मोर्चाप्रमाणेच हा मोर्चाही मूक मोर्चा असणार आहे. यामध्ये कोपर्डी प्रकरणाचा निकाल जलद गतीने झाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झालीच पाहिजे. अ‍ॅट्रासिटीसारख्या कायद्याचा गैरवापर होतो, यासाठी कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे. मराठा समाजासाठी तत्काळ आरक्षण जाहीर करून अंमलबजावणी करावी, अशा मागण्या या मोर्चातून करण्यात येणार आहेत. सकल मराठ्यांना या मूक मोर्चात सहभागी करण्याच्या जनजागृतीसाठी ही मोटारसायकल परिक्रमा रॅली रविवारी काढली गेली. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा