शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा व ओबीसीमधील वाढती दरी गंभीर!

By admin | Updated: October 24, 2016 02:48 IST

सरकारची बोटचेपी भूमिका कारणीभूत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप.

चिखली, दि. २३- मराठा आणि दलित यांचे व्यावहारिक संबंध परंपरागत आहेत. यांच्यातील भांडण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते. हे भांडण महिनाभर अधिक वर्षभरा पुरते असते. तद्नंतर त्यांच्यात परस्परांवर अवलंबून असल्याने सलोखा निर्माण होतो; परंतु मराठा आणि ओबीसी या समाजामध्ये आरक्षण मोर्चाच्या निमित्ताने निर्माण होत असलेली दरी मोठी आहे. त्याचबरोबर गंभीरदेखील. या दरीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून गैरविश्‍वास वाढीस लागला आहे. याला सरकारची बोटचेपी भूमिका कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.स्थानिक मौनीबाबा संस्थानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसेनजित पाटील, अशोकराव सोनुने, शरद वसतकार, अँड.राहुल धुरंधर, विनोद कळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. अँट्रॉसिटी कायद्यासंदर्भात बोलताना अँड. आंबेडकर म्हणाले, की अँट्रॉसिटीचा दुरुपयोग मराठय़ांकडूनच होत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. याचा बोध घेऊन मराठय़ांनी त्याचा गैरवापर थांबविणे गरजेचे आहे. यासोबतच मराठा आणि मुस्लीम या दोन्ही समाजाला आरक्षणाची गरजच नाही. या दोन्ही समाजाच्या समस्या वेगळय़ा आहेत. मुस्लिमांनी आपल्याला शिक्षण कुठल्या माध्यमातून घ्यायचे, उर्दू, मराठी, इंग्रजी की मदरशातून की शाळा, कॉलेजातून हे अगोदर ठरविले पाहिजे. जर मदरशातून घ्यायचे असेल तर त्यांना आरक्षण देऊन उ पयोग काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मराठा समाजातील घरणेशाही सं पुष्टात आणून सर्वसामान्य गरीब मराठय़ांच्या हाती सत्ता देणे गरजेचे आहे. मराठा मूक मोर्चाच्या निमित्ताने त्या घराणेशाहीच्या विरोधातील असंतोषदेखील उफाळून आल्याचे दिसून आले. घराणेशाही गाडली तरच पुरोगामीत्व टिकेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आरक्षण हा विकासाचा मुद्या नाही. आरक्षण मागणे हा लोकशाहीचा एक भाग असला, तरी हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे आपण मानतो. मराठा मूक मोर्चाच्या निमित्ताने सहभागी झालेल्या ङ्म्रीमंत मराठय़ांबाबत गरीब मराठय़ांनी विचार केला पाहिजे, की हे लोक आपले विडंबन तर करीत नाहीत ना. हे विडंबन गरीब मराठय़ांनीच थांबविले पाहिजे. मराठा मूक मोर्चासंदर्भात शासन ठोस भूमिका घेत असल्याचे दिसून येत नाही. या सरकारचा कारभार कुठे चाललाय? हा देखील मोठ प्रश्न आहे. या सरकारचं काय चाललयं, हे फक्त संघ आणि सरकार या दोहोंनाच ठाऊक असल्याची पुस्ती त्यांनी यावेळी जोडली.