अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे ११ डिसेंबर २०२०नुसार घोषित केलेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे. घोषित केलेले आरक्षण कुठल्याही परिस्थितीत रद् करू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासाेबत ॲड. आंबेडकर यांनी बुधवारी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनीदेखील घोषित केलेल्या आरक्षणासंदर्भात शासनाचे मत घेऊन घोषित आरक्षणामध्ये बदल होणार नाही, असे आश्वासित केले. बैठकीला उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे, प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, ॲड. संतोष रहाटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ. प्रसन्नजीत गवई, युवानेता पराग गवई, संतोष अग्रवाल या महत्वपूर्ण बैठकीला उपस्थित होते.
सुधीर कॉलनीत कोरोना योद्धा महिलांचा सत्कार!!!!
अकाेला सुधीर कॉलनी येथील श्रीराम वाटिकेत परिसरात राहणाऱ्या कर्तृत्ववान महिला, कोरोना योद्धा, उच्चशिक्षित गृहिणी यांना काेराेनायाेद्धा म्हणून
सन्मानित करण्यात आले. यावेळी स्नेहल चौधरी कदम, कल्पना देशमुख, वंदना पिंपळघरे, अनिता गुरव, अरुणा मानकर, कांचन म्हैसने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन मंगला रमेशराव काळे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपना सचिन काळे, प्रज्ञा किशोर काळे, रोशनी अमित देशमुख, मीनाक्षी पाटील, रश्मी कोल्हटकर, निशाली पंचगाम, मानसी सभापतीकर यांनी परिश्रम घेतले. रांगोळीचे सुंदर रेखाटन अंकिता वसंतराव मोहोकर हिने केले, तर संचालन प्रेरणा सरोदे हिने केले. पूजा प्रवीण काळे यांनी आभार मानले. यावेळी शिल्पा तेल्हारकर, राखी घुले, गिऱ्हे, सोनाली नितीन मुळतकर, नयना गजानन निंभोरकर, संगीता भटुरकर, रोहिणी अतुल वाणकर, पद्मजा पांडे, शुभांगी चंदन, पुजा जोशी, रेणू अरुण राऊत... या कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले.