अकोला : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यासाठी ३५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी कृषी विभागामार्फत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे (महाबीज) करण्यात आली; प्रत्यक्षात आतापर्यंत मागणीच्या तुलनेत ह्यमहाबीजह्णकडून केवळ ५ हजार ८00 क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात महाबीजकडून जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पेरणीचे प्रस्तावित क्षेत्र, बियाणे-खतांची मागणी यासंदर्भात कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यासाठी एकूण ७५ हजार ८४ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी कृषी विभागामार्फत करण्यात आली. त्यामध्ये ३५ हजार क्विंटल बियाण्याची मागणी महाबीजकडे करण्यात आली. मात्र खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच, मागणीच्या तुलनेत शनिवार, ३१ मे पर्यंत महाबीजकडून केवळ ५ हजार ८00 क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत महाबीजकडून सोयाबीन बियाण्याचा झालेला अत्यल्प पुरवठा लक्षात घेता, यावर्षीच्या खरीप हंगामात महाबीजकडून सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी
By admin | Updated: June 1, 2014 00:54 IST