शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 20:37 IST

अकोला- भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी शहरातुन भक्तीपूर्ण वातावरणात आणि जय जिनेंद्रच्या जयघोषात वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली.

अकोला : सत्य, अहिंसा, अपरिग्रह अशा मूल्यांचा संदेश देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी शहरातुन भक्तीपूर्ण वातावरणात आणि जय जिनेंद्रच्या जयघोषात वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली. रविवारी महावीर जयंतीनिमित्त सकाळी गांधी-जवाहर बाग येथून महावीर स्तंभचे जैन समाजातील मान्यवरांनी पूजन केले. महिला मंडळाच्या वतीने सकाळी भगवान महावीर यांची पालना आराधना करण्यात आली. त्यानंतर ‘श्री’ १०८ कलशांचा भगवान महावीर यांचा अभिषेक करण्यात आला. तसेच अष्टक पूजा आणि आरती करण्यात सायंकाळी श्री सेनगन जैन मंदिरापासून भक्तीपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या रथावर भगवान महावीरांची देखणी मुर्ती लक्ष वेधून घेत होती. शोभायात्रेमध्ये विविध प्रकारचे चित्ररथ सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या अग्रस्थानी महिलाभगिनी सहभागी झाल्या होत्या. शहरातील जैन संप्रदायातील शेकडो नागरीक सहभागी झाले होते. सेनगण जैन मंदिर येथून प्रारंभ झालेली शोभायात्रा जयहिंद चौक, कोतवाली चौक येथे आली. तेथुन शोभायात्रा जुना कापड बाजार, जैन मंदिर व गांधी चौकातून पुढे आली. मार्गांवर शोभायात्रेचे विविध धार्मिक व सामाजिक संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा सैतवाल दिगंबर जैन मंदिर येथे पोहोचली. याठिकाणी शोभायात्रेचे समापन करण्यात आले. आदिनाथ जैन मंदिरातर्फे शोभायात्रागांधी चौक परिसरातील कुंभार गल्लीतील प्राचीन आदिनाथ जैन मंदिरात भगवान महावीरांचा जन्मोत्सव भक्तीपूर्ण वातावरण साजरा करण्यात आला. जैन मंदिरात भगवान महावीरांचे सकाळी विधिवत पूजन करण्यात आला. त्यानंतर भगवान महावीरांची भव्य रथावर आदिनाथ जैन मंदिर, संघवीवाडी व वर्धमान भवनातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा कोतवाली चौक, राम मंदिर, टिळक रोड, कापड बाजार, सराफा बाजारमार्गे गांधी चौक आल्यावर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळी अंतरिक्ष पार्श्वनाथ भक्ती मंडळातर्फे भक्ती संध्या सादर करण्यात आली.