शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी करून महिलेचे दागिने लुटले!

By admin | Updated: April 26, 2017 01:38 IST

अकोला : पूजा करून घरी परत जाणाऱ्या वृद्धेस दोन युवकांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची घटना रजपूतपुरा येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.

अकोला : पूजा करून घरी परत जाणाऱ्या वृद्धेस दोन युवकांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची घटना रजपूतपुरा येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. चेकींग सुरू असून, आपल्याकडील मौल्यवान वस्तु काढा, असे सांगून त्यांच्याकडील ७० हजार रुपयांच्या ४० ग्रॅमच्या चार सोन्याच्या बांगड्या लुटले.रजपूतपुरा येथील वर्धमान कॉम्प्लेक्समधील रहिवासी रेखा हसमुखलाल शाह (५९) या घराजवळच असलेल्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. पूजा आटोपल्यानंतर त्या परत जात असताना त्यांच्याजवळ दोन युवक आले आणि त्यांनी, समोर पोलिसांची तपासणी सुरू असल्याने तुम्ही तुमच्याकडील दागिने काढून बॅगमध्ये ठेवा, असे सांगितले. सदर महिलेने या दोघांवर विश्वास ठेवत ४० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्या पर्समध्ये ठेवल्या, महिलेने सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवताच या दोन युवकांनी महिलेच्या हातातील पर्स घेऊन पळ काढला, त्यानंतर रेखा शाह यांनी आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत दोन्ही अज्ञात चोरटे पसार झाले. काही वेळातच त्यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनीही घटनास्थळ गाठले; मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून रेखा शाह यांची चौकशी केली; मात्र सदर घटनेमुळे घाबरलेल्या शाह व्यवस्थित माहिती पोलिसांना देऊ शकल्या नाहीत. सायंकाळी पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावून रेखा शाह यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.