शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या नोंदणीला स्थानिक स्वराज्य संस्थांचा 'खो'

By admin | Updated: August 21, 2015 22:49 IST

काटेकोर अंमलबजावणी करण्याचे नगरविकास विभागाचे निर्देश.

कारंजा (वाशिम) : नागरिकांच्या जन्म, मृत्यूच्या नोंदीप्रमाणेच अपंग व्यक्तिंची नोंदही स्थानिक स्वराज्य संस्थांनी करण्याच्या स्पष्ट सूचना शासनाने दिल्या असल्या तरी, या सूचनांचे पालन मात्र स्थानिक स्तरावर होत नाही. यासंदर्भात शासनाने २0 ऑगस्ट रोजी नव्याने निर्देश देत, अंपग व्यक्तिंची नोंद करून तद्विषयक अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना केल्या आहेत. नागरिकांच्या जन्म आणि मृत्यूची नोंद महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये केली जाते. त्याचप्रमाणे अपंग प्रमाणपत्र सादर करणार्‍या अपंग व्यक्तींची नोंदणीही स्थानिक स्तरावर करण्याच्या सूचना ४ ऑक्टोबर २0१३ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या होत्या; जवळपास २ वर्षे होत आली तरी, या सूचनांचे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने यासंदर्भात २0 ऑगस्ट रोजी नव्याने परिपत्रक जारी करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंगांची नोंद, नोंदणी रजिस्टरमध्ये घेऊन सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि अनुपालन अहवाल शासनास सादर करावा, असे २0 ऑगस्ट रोजी शासनाच्या नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे अपंगांना स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असून, अपंगांची आकडेवारी मिळविणेही शक्य होणार आहे.