शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला जाळल्याप्रकरणी जन्मठेप

By admin | Updated: December 25, 2014 01:49 IST

अकोला जिल्ह्यातील घटना.

अकोला : किळकोळ वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळणार्‍या पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाश्रीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा येथील प्रल्हाद निनाजी भालेराव (५७) याचे पत्नी पार्वताबाई (४५) हिच्यासोबत नेहमीच वाद होत असत. तो पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असे. ३ जून २0१३ रोजी प्रल्हाद व पार्वताबाई हे धाबा शिवारात शेतीच्या कामावर गेले होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ते पिंपळखुटा येथे परतले. त्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्याचवेळी प्रल्हादने रॉकेलची कॅन पार्वताबाईच्या अंगावर ओतली आणि तिला पेटवून दिले. यात ती ५७ टक्के जळाली. तिला अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते. तिच्या जबाबावरून बाश्रीटाकळी पोलिसांनी प्रल्हादविरुद्ध भादंविचे कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली. पार्वताबाईचा मृत्यू २३ जून २0१३ रोजी झाला. त्यानंतर पोलिसांनी पतीवर भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. बाश्रीटाकळीचे तत्कालीन ठाणेदार डी. आर. भोज यांनी या प्रकरणाचा तपास करून, न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले. सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी प्रल्हाद भालेराव याला जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ विनोद फाटे यांनी, तर आरोपीतर्फे अँड. आशीष देशमुख यांनी बाजू मांडली. *महत्त्वाचा साक्षीदारच फितुरपार्वताबाईने रुग्णालयामध्ये एका साक्षीदारासमोर तोंडी मृत्युपूर्व जबाब दिला; परंतु सुनावणीदरम्यान हा साक्षीदारच न्यायालयात फितुर झाला. महत्त्वाचा साक्षीदारच फितुर झाल्याने आरोपी निर्दोष सुटण्याची शक्यता होती; परंतु न्यायालयाने उर्वरित तीन साक्षीदारांच्या साक्षीवर विश्‍वास ठेवून महत्त्वाचा निर्णय दिला.