शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस व्यवहार उठला शेतक-यांच्या जीवावर

By admin | Updated: January 6, 2017 02:46 IST

कर्जाची वसुली; शेतमाल विक्रीची जमा रक्कम देण्यावर बँकाचे निर्बंध.

सदानंद सिरसाट अकोला, दि. ५- तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन न केलेल्या शेतकर्‍यांना चालू वर्षात बँकांनी पीक कर्ज तर दिलेच नाही. आता कॅशलेस व्यवहारामुळे त्या थकीत शेतकर्‍यांना शेतमालाची रक्कम धनादेशाने दिली जात आहे. जमा होणारी रक्कम खात्यातून काढण्यास बँकांनी निर्बंध लावल्याने हजारो शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. हा प्रकार घडलेल्या गांधीग्राम येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत धाव घेतलेल्या शेतकर्‍यांना कर्ज भरल्याशिवाय रक्कम मिळणार नाही, अशी तंबीच देण्यात आल्याने ते हवालदिल झाले आहेत.ैगेल्या २00९ पासून जिल्हय़ात पावसाच्या लहरीपणामुळे सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे २0१६ पर्यंतच्या सर्वच हंगामात शेतकर्‍यांना पीक कर्जाच्या रकमेची परतफेड करणेही शक्य झाले नाही. त्यावर उपाय म्हणून शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यांना नव्याने कर्ज देण्यात आले; मात्र त्यावेळी काही शेतकर्‍यांनी कर्जाचे पुनर्गठन केले नाही. नवीन कर्जही घेतले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी २0१४-१५ पर्यंत थकीत झाले. चालू वर्षात २0१६-१७ च्या खरीप, रब्बी हंगामातही शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यामध्ये दरवर्षी कर्ज घेतले; पण ते थकीत असलेल्या शेतकर्‍यांनाच पुनर्गठनाचा लाभ देण्यात आला. ज्यांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले नाही. आधीच्या वर्षी घेतलेले कर्ज दुसर्‍या वर्षी थकीत ठेवले, त्यांना चालू वर्षातही बँकांनी कर्ज दिलेले नाही. त्यामुळे अकोला जिल्हय़ातच हजारो शेतकरी वंचित राहिले. आता शेतमालाची रक्कम मिळणेही कठीणशेतकर्‍यांची एकदा घेतलेल्या पीक कर्जाची रक्कम थकीत असल्याने ती वसूल करण्याची कारवाई बँकांनी सुरू केली आहे. त्यातच आता कॅशलेस व्यवहार असल्याने शेतमालाची रक्कम धनादेशाद्वारेच दिली जात आहे. त्या धनादेशाची रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर शेतकर्‍यांना ती काढता येत नाही. त्यावर बँकांनी निर्बंध लावले आहेत. त्याबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांना तुम्ही काहीही करा, थकीत कर्ज भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, अशी तंबी बँकेचे अधिकारी देत आहेत. शासनाचा रिझर्व्ह बँकेकडे प्रस्तावराज्यभरात लाखो शेतकरी या तांत्रिक मुद्यामुळे पीक कर्जापासून वंचित होते. त्यावर शासनाने रिझर्व्ह बँकेकडे या शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी बँकांना निर्देश देण्याची मागणी प्रस्तावाद्वारे केली होती; मात्र त्यावर काहीच निर्देश न मिळाल्याने शेतकरी वंचितच आहे.गांधीग्राम येथे घडला प्रकारशेतकर्‍यांनी कापसाच्या विक्रीतून मिळालेला धनादेश बँकेत जमा केला. त्याची रक्कमही बँकेत जमा झाली. ती काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकर्‍यांना कर्ज भरल्याशिवाय रक्कम मिळणार नाही, असे शाखाधिकारी, वसुली अधिकारी यांनी सांगितले. एटीएम कार्डचा वापर करूनही ती निघत नाही. त्यामुळे शेतकरी आता बिथरले आहेत. पाच शेतकर्‍यांसोबत हा प्रकार घडला आहे.