शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

राज्यातील ग्रंथालयांना श्रेणीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 7, 2016 02:13 IST

१२ हजार ग्रंथालयांचा समावेश; कर्मचा-यांची होरपळ.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा)राज्यात अ,ब,क,ड दर्जाचे जवळपास १२ हजार ४00 सार्वजनिक गं्रथालये आहेत; परंतु गत तीन वर्षांपासून नविन ग्रंथालयांच्या मान्यतेसह श्रेणी देणे बंद केल्याने राज्यातील १२ हजाराच्यावर सार्वजनिक ग्रंथालयांचा दर्जा वाढू शकला नाही. परिणामी अनुदानातही वाढ होत नसल्याने गं्रथालयीन कर्मचार्‍यांची होरपळ होत आहे. वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी या हेतूने ह्यगाव तेथे ग्रंथालयह्ण ही संकल्पना राज्यभर राबविली जात आहे. राज्यात अ,ब,क,ड श्रेणीची सुमारे १२ हजार ४00 सार्वजनिक गं्रथालये आहेत. तर अमरावती विभागामध्ये १ हजार ८९४ सार्वजनिक ग्रंथालये आहेत. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३९९, अकोला जिल्ह्यात ४७३, बुलडाणा जिल्ह्यात ३५७, यवतमाळ जिल्ह्यात ३५३ व वाशिम जिल्ह्यात ३१२ सावर्जनिक गंथालये आहेत. सर्व ग्रंथालयांना अ,ब,क,ड श्रेणी देण्यात आलेली आहे. ग्रंथालयाच्या श्रेणीनुसार संबंधित ग्रंथालयांना शासनस्तरावरून अनुदान देण्यात येते. त्यामध्ये ह्यअह्ण दर्जा असलेल्या ग्रंथालयांना वार्षिक २ लाख ८८ हजार रुपये अनुदान देण्यात येते. ह्यबह्ण दर्जा असलेल्या ग्रंथालयांना वार्षिक १ लाख ९२ हजार, ह्यकह्ण दर्जा असलेल्या गं्रथालयांना ९६ हजार रुपये अनुदान वर्षाकाठी देण्यात येते. तर ह्यडह्ण दर्जा असलेल्या ग्रंथालयांना ३0 हजार रुपये अनुदान देण्यात येते. वर्षाकाठी मिळणार्‍या या तुटपुंज्या अनुदानातूनच सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचार्‍यांना ग्रंथालयातील सर्व खर्च भागवावा लागतो; परंतू गत तीन वर्षापासून नविन ग्रंथालयांच्या मान्यतेसह श्रेणी देणे बंद केल्याने राज्यातील १२ हजाराच्यावर सार्वजनीक ग्रंथालयाचा दर्जा जैसे थे राहिला आहे. सार्वजनिक ग्रंथालयांना श्रेणी मिळत नसल्याने गं्रथालयांचे अनुदानही वाढू शकत नाही. यामुळे गं्रथालयीन कर्मचार्‍यांना नविन पुस्तकांच्या खरेदीसह इतर साहित्यांसाठी करावा लागणारा खर्च, तसेच कर्मचार्‍यांचे वेतन याचा ताळेबंद जुळविणे अवघड झाले आहे. यात 'ड' श्रेणी असलेल्या गं्रथालयांना तर ३0 हजार रुपयात वर्षभराचा खर्च भागवावा लागत आहे. श्रेणी वाढत नसल्याने सार्वजनिक ग्रंथालयांचा विकास रखडला आहे.