गत चार-पाच दिवसांपासून गावात बिबट्याचा वावर वाढला आहे. गावातील अनंत गावंडे व शेतमजूर चंदन हे शेतात काम करीत असताना, त्यांना बिबट्याचे पायाचे ठसे आढळून आले होते. शनिवारी, दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी शेतमजूर चंदन गेले असता, त्यांना प्रत्यक्ष बिबट्या दिसून आला. त्याने लगेच गावात धाव घेऊन ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली असता, बिबट्याने श्वानाची शिकार केल्याचे दिसून आले. येथील माजी सरपंच विजेंद्र तायडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावरून वन्यजीव विभागाचे नितेश पवार व टीम हजर झाली होती. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.
पोपटखेड शिवारात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST