शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आठ शहरांमध्ये लागणार एलईडी पथदिवे!

By admin | Updated: October 22, 2016 02:41 IST

केंद्र शासनाकडून कंपनीची नियुक्ती.

आशिष गावंडेअकोला, दि. २१- महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये एलईडी पथदिवे उभारून त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केंद्र शासनाने ह्यईईएसएलह्ण कंपनीला दिले आहे. कंपनीच्या माध्यमातून एलईडी लावण्याचे निर्देश राज्यातील आठ महापालिकांना प्राप्त झाले आहेत. वीज बचत करण्याच्या उद्देशातून सीएफएल पथदिव्यांना बाजूला सारत लख्ख उजेड देणार्‍या एलईडी पथदिव्यांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. राज्यातील आठ महापालिकांमध्ये केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या ह्यईईएसएलह्ण कंपनीमार्फत एलईडी पथदिवे उभारण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. कंपनीने पथदिवे लावल्यानंतर सात वर्षांंपर्यंंत त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची अट नमूद आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित कंपनीला दिल्यास महापालिकेची मोठी आर्थिक बचत होईल, असे मानल्या जात आहे. दहा वर्षांंंपूर्वी बहुतांश मनपा क्षेत्रात सोडियम पथदिव्यांचा वापर केला जात असे. त्या बदल्यात महापालिकांना अतिरिक्त वीज देयकाचा भुर्दंंड सहन कराव लागत होता. त्याला पर्याय म्हणून सीएफएल पथदिव्यांचा वापर करण्यात आला. सीएफएलमुळे लख्ख उजेड पडत नसल्याने नागरिकांना अंधूक उजेडाचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यानिमित्ताने एलईडीचा पर्याय समोर आला आहे. प्रकाशमान असणार्‍या एलईडी पथदिव्यांसाठी वीज कमी लागत असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला असून, मनपा क्षेत्रामध्ये एलईडी पथदिवे लावण्यासाठी ह्यईईएसएलह्ण कंपनीची नियुक्ती केली. आठ महापालिकांना निर्देशअकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे, मीरा-भाईंदर, मालेगाव, भिवंडी-निजामपूर व वसई-विरार या महापालिका क्षेत्रात एस्को तत्त्वावर एलईडी पथदिवे लावण्याचे नगरविकास विभागाचे निर्देश आहेत. त्यानुसार महापालिकांनी प्रक्रिया सुरू केली आहे.२0 कोटींचे लागणार पथदिवेएलईडी पथदिव्यांसाठी स्थानिक आमदारांना शासनाने १0 कोटींची रक्कम मंजूर केल्यानंतर उर्वरित दहा कोटींचा हिस्सा मनपाने जमा करण्याची अट आहे. मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून उर्वरित दहा कोटींची रक्कम जमा केली असून, एकूण २0 कोटी रुपयांतून शहरातील प्रमुख रस्ते व प्रमुख चौकांमध्ये प्रकाशमान एलईडी पथदिवे उभारल्या जातील.