लोकमत न्यूज नेटवर्कउरळ: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गायगाव येथे उरळ पोलिसांनी धाड टाकून अवैधरीत्या साठवून ठेवलेले ९० लीटर पेटोल जप्त केले. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयाने ३० मे रोजी जामीन मंजूर केला. गायगाव येथे जफरखान बाबरखान पठाण हा अवैधरीत्या पेट्रोलची साठवणूक करीत असल्याची माहिती उरळ पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून जफरखान यास अटक केली तसेच त्याच्याकडून ९० लीटर पेट्रोल किंमत ६,३०० रुपये जप्त केले. या प्रकरणी जफरखान विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात हेकॉ दादाराव लिखार, पोकॉ प्रवीण मोरे करीत आहेत.
गायगाव येथे ९० लीटर पेट्रोल जप्त
By admin | Updated: May 31, 2017 01:31 IST