शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भूमि अभिलेख कर्मचार्‍यांचा संप सुरू

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

विविध मागण्यासाठी भूमि अभिलेख विभागातील कर्मचार्‍यांचा बेमुदत संप; भूमी अभिलेख विभागाचे जिल्ह्यातील कामकाज ठप्प.

अकोला : विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी भूमि अभिलेख विभागातील कर्मचार्‍यांनी शनिवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये कामकाज ठप्प झाले आहे.भूमि अभिलेख विभागाला तांत्रिक खाते म्हणून मान्यता देण्यात यावी, शेतमोजणी, शहर मापन, गावठाण मोजणी, भूसंपादन मोजणी तसेच कार्यालयीन तांत्रिक कामे करणार्‍या तृतीय श्रेणी संवर्गातील कर्मचार्‍यांना सिव्हिल पदवीधारक, उपअभियंताप्रमाणे तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्यांसह विविध १५ मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शनिवार, १६ ऑगस्टपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी सहभागी झाल्याने भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक, तालुका भूमी अभिलेख कार्यालय अंतर्गत कामकाज ठप्प झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतजमीन मोजणी, शहर विभागातील भूमापन मोजणी, मिळकत पत्रिकांची नक्कल, फेरफार नोंदी भूसंपादनाची कामे इत्यादी प्रकारचे कामकाज ठप्प झाले आहे. संपामुळे कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.संपात सहभागी झालेल्या भूमी अभिलेख कर्मचार्‍यांनी भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. त्यामध्ये संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल वरकडे,जे.एस.शिंदे, व्ही.के. जाधव, डी.आर.सोळंके, एन.यू.पारधी, बी.एम.गवई, एस.के.टाले, एन.एम.मोरे, स्वाती जांभुरकर, पुनम देवाते, ए.ए.परतेकी, स्वाती ताथोड सहभागी झाले होते.