शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिला रस्त्यावर!

By admin | Updated: June 18, 2017 02:03 IST

बोरगाव मंजू येथे दारूचे दुकान फोडले: पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : गावात नव्याने सुरू होत असलेले दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी गावातील महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. पोलीस स्टेशननंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला होता. तेथे महिलांनी ठिय्या आंदोलन केले, तसेच दारूचे दुकान बंद करण्याची मागणी केली. रामजी नगर, सिद्धार्थ नगर, लक्ष्मी नगर आदींसह शहरात, वस्तीमध्ये नव्याने स्थानांतरित देशी दारूसह वाइन बार, बीअर शॉपी सुरू करू नये, या मागणीसाठी शनिवारी सकाळी १0 वाजता बसथांब्यावर सोपीनाथ महाराज सभागृहात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत या निर्णयाचा निषेध करून गाव दारूमुक्त करण्याचा ग्रामस्थांसह महिलांनी निर्धार केला व घोषणा देत मुख्य मार्गाने मोर्चा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन संपूर्ण गाव दारूमुक्त करावे, नव्याने स्थानांतरित देशी दारूच्या दुकानांना कायमचा आळा घालावा, आदी मागण्यांचे एक निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार पी. के. काटकर यांना दिले. ग्रामस्थांसह महिलांनी शासन व प्रशासनविरोधी रोष व्यक्त केला. यावेळी घोषणा देऊन जोपर्यंंत देशी दारूची, वाइन बार, बीअर शॉपी दुकाने बंद होणार नाहीत, जोपर्यंंत गावात दारूबंदी होणार नाही, तोपर्यंंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार महिला संघर्ष समिती, संत गजानन महाराज सेवा समितीसह ग्रामस्थांनी यावेळी केला. दरम्यान, आजचा मोर्चा, रास्ता रोको आक्रमक न होता शासनाने या समाजहित प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन करून सभेला सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे, डॉ. केशव काळे, नरेंद्र निवाणे, विकास पल्हाडे, रामराव चोटमल, सखाराम वानखडे, भाऊराव वानखडे, दयाराम इंगळे यांच्यासह महिला समिती अध्यक्ष गुंफाबाई वानखडे आदींनी मार्गदर्शन केले.