लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : बाळापूर शहरातील गाझीपुरा भागामध्ये सांडपाण्याची नाली काढण्याच्या वादावरून एकास कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केल्याची घटना १५ जून रोजी घडली.गाझीपुरा भागात राहणारे सुरेश उदेभान मोरे (५२) यांचा घरासमोरील सांडपाण्याची नाली काढण्याच्या कारणावरून मंगेश रामदास निंबाळकर आणि रामदास निंबाळकर यांच्याशी वाद झाला. त्या वादावरून मंगेश व रामदास यांनी सुरेश मोरे यांना कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केले . याबाबतच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसानी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध भादंवि ३२६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सांडपाण्याच्या वादावरून कुऱ्हाड मारली; दोघे अटकेत
By admin | Updated: June 16, 2017 02:17 IST