शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

किशोर खत्री यांची हत्या गोळय़ा झाडूनच!

By admin | Updated: November 5, 2015 02:06 IST

रणजितसिंह चुंगडेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

अकोला - शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री यांची हत्या गोळय़ा झाडूनच करण्यात आल्याचे, बुधवारी उघड झाले. रणजितसिंह चुंगडे यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप, किशोर खत्रींचे बंधू दिलीप खत्री यांनी केल्यानंतर, बुधवारी जुने शहर पोलिसांनी चुंगडे यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. किशोर खत्री यांच्या मृतदेहाचे बुधवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या छातीच्या डाव्या भागातून पिस्तुलाची गोळी आरपार गेल्याचे शवविच्छेदनादरम्यान निष्पन्न झाले. मारेकर्‍यांनी खत्रींचा गळा चिरल्यानंतर, ते जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून पळत सुटले असावे आणि त्यामुळे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला असावा, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.बालाजी ट्रस्टच्या मालकीच्या, पूर्वीच्या चित्रा टॉकीजच्या जागेवर उभारण्यात आलेल्या शॉपिंग मॉलमध्ये किशोर मदनलाल खत्री (४५) यांची भागीदारी होती. मुंबईस्थित एका कंपनीने सदर मॉल उभारला आहे. खत्री यांनी धानुका नामक प्रॉपर्टी ब्रोकरच्या माध्यमातून या मॉलमधील बहुतांश गाळे खरेदी केले होते, असे समजते. मॉलच्या उद्घाटनाच्या मुहूर्तावरून सोमवारी बालाजी ट्रस्टचे रणजितसिंह चुंगडे आणि मॉलची उभारणी करणार्‍या कंपनीच्या अधिकार्‍यांदरम्यान वाद झाला. तो वाद किशोर खत्री यांनी मिटविला; मात्र त्यानंतर मंगळवारी सायंकाळी खत्री यांची सोमठाणा शेतशिवारामध्ये गळा चिरून व गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी बुधवारी चुंगडे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२ व १६९/१५ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके गठित करण्यात आली असून, त्यांनी चुंगडे यांचा शोध सुरू केला आहे. जुने शहर पोलिसांनी या हत्या प्रकरणातील चार संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याशिवाय रणजितसिंह चुंगडे यांच्या विश्‍वजित व बंटी नामक पुत्रांचीही मंगळवार रात्रीपासून चौकशी करण्यात येत आहे. आज होणार आर्म्स अँक्टचा गुन्हा दाखलशवविच्छेदन अहवालाची लेखी प्रत पोलिसांना गुरुवारी प्राप्त होणार असून, त्यानंतर चुंगडे यांच्याविरुद्ध आर्म्स अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. चुंगडे यांच्या सफारी कारमधून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्यामधीलच एका पिस्तुलाचा वापर खत्री यांच्या हत्येसाठी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.