शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

किडनी ब्रोकरचे जाळे राज्यभर!

By admin | Updated: December 8, 2015 02:22 IST

किडनी तस्करी ; मुंबई, पुण्यातील नामांकित हॉस्पिटलशी कोळीचा संपर्क .

नितीन गव्हाळे / अकोला : किडनी तस्करी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे केवळ नागपूर, औरंगाबाद, सांगलीपर्यंंतच र्मयादित नसून, थेट मुंबई, पुण्यापर्यंंत पोहोचले असल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. एखाद्या प्रॉपर्टी ब्रोकरसारखा व्यवहार करणारा या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवाजी कोळी याचा राज्यभर फिरून किडनी विकण्याचा गोरखधंदा असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर म्हटले आहे.शिवाजी कोळी हा किडनी तस्करी प्रकरणाचा सूत्रधार म्हणून समोर आला आहे. त्याला अटक केल्यानंतर ध क्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. कोळीला पोलीस कोठडीत घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयासमोर दिलेली माहिती धक्कादायक आहे. या माहितीनुसार, कोळीने आतापर्यंंत १२ ते १५ व्यक्तींच्या किडन्या काढून, मुंबई, पुणे, रायगड, सातारा, सांगली, यवतमाळ, नागपूर, किनवट येथील किडनी निकामी झालेल्या रूग्णांच्या शरीरात प्रत्यारोपण केले. त्यासाठी तो राज्यभरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये फिरून कोळी किडनी निकामी झालेले रुग्ण शोधायचा. तो मुख्यत्वे धनाढय़ रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्याच्याकडे किडनी दाता असल्याचे सांगायचा.किडनी निकामी झालेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईक, कुटुंबीय कोळीने मागितलेली रक्कम मोजायला तयार व्हायचे. अशा रूग्णांच्या शोधात तो नागपूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथील नामांकित हॉस् िपटलमध्ये नेहमी संपर्क ठेवायचा. आपल्या सहकार्‍यांच्या माध्यमातून पैशांची निकड असलेल्या व्यक्तींना हेरायचे, त्यांना चार ते पाच लाख रूपयांचे आमिष दाखवून किडनी विक्रीसाठी भाग पाडायचे आणि धनाढय़ रुग्णांना ती किडनी १0 ते १५ लाख रूपयात विकायची, अशी कोळीची कार्यपद्धती तपासात समोर आली आहे. आता पोलीस कोळीच्या संपर्कातील मुंबई, पुण्यातील हॉस्पिटल तसेच त्याच्याकडून किडनी खरेदी केलेल्या रुग्णांपर्यंंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.