शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

खेर्डा खुर्दला ३२ लाखांचा पुरस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:23 IST

बार्शीटाकळी तालुक्यातून मिळविला प्रथम क्रमांक

ठळक मुद्देवॉटर कप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलसंधारणासाठी ग्रामस्थांचा सहभाग वाढावा, यासाठी अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप ही स्पर्धा राबवण्यात आली होती. या स्पर्धेत  खेर्डा खुर्द गावाने बार्शीटाकळी तालुक्यातून प्रथम पुरस्कार पटकावला आहे. या गावातील ग्रामस्थांची चिकाटी पाहून आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांनी पुरस्कार रकमेची घोषणा केली आहे. त्यामुळे या गावाला तब्बल ३२ लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या अकोट तालुक्यातून जितापूर नाकटने, तर पातूर तालुक्यातून पांगरताटी या गावाने प्रथम पुरस्कार पटकावला. अभिनेता आमिर खान यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत. जलसंधारणाच्या कामात लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी वॉटर कप ही स्पर्धा सुरू करून राज्य तसेच तालुका स्तरावर पुरस्कारांची घोषणा केली होती. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातून बार्शीटाकळी, अकोट आणि पातूर या तालुक्यातील गावांनी सहभाग घेतलाहोता. या स्पर्धेचा निकाल ६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातून प्रथम पुरस्कार खेर्डा खुर्द या गावाने पटकावला. या गावाला पाणी फाउंडेशनच्यावतीने १० लाख रुपये, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आठ लाख रुपये मिळणार आहेत, तसेच ग्रामस्थांची चिकाटी पाहून आमदार हरीश पिंपळे यांनी १० लाख तर जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने यांनी चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे या गावाला ३२ लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. बार्शीटाकळी तालुक्यातून द्वितीय क्रमांक सरावने पटकावला, तर तिसरा क्रमांक हातोला गावाला मिळाला. दुसºया क्रमांकासाठी ७.५ लाख, तर तिसºया क्रमांकाला पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. अकोट तालुक्यातून प्रथम पुरस्कार जितापूर नाकटने पटकावला. या गावाला १० लाख रुपये पाणी फाउंडेशन व आठ लाख रुपये महाराष्ट्र शासनाच्यावतीने मिळणार आहेत. तालुक्यातून दुसरा क्रमांक मिर्झापूर, तर तिसरा क्रमांक उमरा या गावाने पटकावला. पातूर तालुक्यातून प्रथम पुरस्कार पांगरताटी या गावाने पटकावला, तर द्वितीय क्रमांक शिर्ला व तिसरा क्रमांक चारमोळी या गावाने पटकावला. त्यांना अनुक्रमे १८ लाख, ७.५ लाख आणि पाचलाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. जलसंधारणाठी ग्रामस्थांनी केलेल्या परिश्रमामुळे गावांना लाखो रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत.