शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

खरीपातील कांद्याला नोव्हेंबरमध्ये मिळणार १७00 रुपये क्विंटल भाव!

By admin | Updated: July 24, 2015 00:56 IST

डॉ. पंदेकृविच्या कृषी अर्थशास्त्र सांख्यिकी विभागाचे भाकित.

अकोला : येत्या खरीप हंगामातील कांदा या भाजीपाला पिकाला प्रतिक्विंटल १६00 ते १७00 रुपये भाव मिळण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग व केंद्रीय कृषी विपणन केंद्राने वर्तविली आहे. कांदा उत्पादनात भारत हा जगात दुसर्‍या क्रमांकावर असून, भारतातील कांद्याला मलेशिया, बाग्लादेश, युनायटेड अरब अमिरात, श्रीलंका, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशात खूप मागणी आहे. भारतात कांदा उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांवर असून, उत्पादनातील वाटा २७ टक्के (४५.४६ दशलक्ष टन) एवढा आहे. या राज्यात कांदा पिकाखालील क्षेत्र हे ४.६६ दशलक्ष हेक्टर आहे. महाराष्ट्राखेरीज कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार, तामिळनाडू, राजस्थान आणि हरियाणा ही कांदा उत्पादन घेणारी महत्त्वाची राज्यं आहेत. राष्ट्रीय बागायती संशोधन व विकास संशोधनानुसार महाराष्ट्रात २0१४-१५ मध्ये कांदा लागवडीखालील क्षेत्र ४.५७ दशलक्ष हेक्टर होते, तर उत्पादन ५६.५४ दशलक्ष टन होते. २0१३-१४ मध्ये हेच क्षेत्र ४.६८ दशलक्ष हेक्टर होते, तर उत्पादन ५८.६४ दशलक्ष टन एवढे होते. यावर्षी अपेक्षित कांद्याचे उत्पन्न व किमतीचा कल या सर्व गोष्टींचा विचार करू न अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र धोरण संशोधन केंद्र व नवी दिल्ली येथील कृषी विपणन केंद्राच्या चमूने नाशिक जिल्हय़ातील लासलगाव बाजारपेठेतील मागील ११ वर्षांंच्या कालावधीतील कांदा पिकाच्या मासिक सरासरी किमतीचे पृथक्करण केले असून, या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार बाजारातील चालू किंमती कायम राहिल्यास सामान्य हवामानात वेगवेगळ्य़ा प्रतवारीनुसार येणार्‍या नोव्हेंबर महिन्यात कांद्याची सरासरी किंमत प्रतिक्विंटल १६00 ते १७00 रुपये राहण्याची शक्यता आहे; परंतु आयात-निर्यात धोरणात झालेले बदल, तसेच सद्यस्थितीत हवामानात होणार्‍या बदलाचा परिणाम कांद्याच्या किमतीवर होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. खरीप हंगामातील कांद्याला नोव्हेंबर महिन्यात १६00 ते १७00 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची शक्यता आहे; परंतु आयात-निर्यात धोरणात झालेले बदल, तसेच सद्यस्थितीत हवामानात होणार्‍या बदलाचा परिणाम कांद्याच्या किमतीवर होऊ शकतो. या माहितीमुळे पीक पेरणीचा व निविष्ठा वापराचा योग्य निर्णय शेतकर्‍यांना घेता येणार असल्याचे कृषी विद्यापीठाचे कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले.