शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीक विमा टक्केवारीत वाढ आवश्यक!

By admin | Updated: June 29, 2015 02:05 IST

कृषी अर्थशास्त्रज्ञ करणार अभ्यास.

राजरत्न सिरसाट /अकोला : शेतकर्‍यांनी शंभर टक्के पीक विमा काढण्यासाठी पीक विमा जोखीम स्तरात ८0 टक्के वाढ करणे गरजेचे असल्याने कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाला नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. याकरिता येत्या जुलै महिन्यात या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मंथन होणार असल्याचे वृत्त असून, पीक विमासंदर्भात खरीप हंगामातील सर्वंच पिकांचा येत्या वर्षात अभ्यास करण्यात येणार आहे. पीक उत्पादनात येणारी अनियमितता भरू न काढण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यास मदतदायक ठरत असल्याचा निष्कर्ष डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्रज्ञांनी गेल्यावर्षी काढला असून, रब्बी पीक विमा शेतकर्‍यांना फायदेशीर ठरत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. पावसाची वाढलेली अनियमितता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अलीकडे पिकांचे उत्पादन घटण्याचे प्रमाण वाढले आहे. पण विमा नुकसानभरपाईची जोखीम स्तराची टक्केवारी मात्र जुनीच आहे. सध्या उंबरठा उत्पन्नाच्या ६0 टक्केपेक्षा कमी उत्पादन आल्यास नुकसानभरपाई मिळण्यास शेतकरी पात्र ठरतो. म्हणजेच पीक कापणी प्रयोगातील सरासरी उंबरठा उत्पन्नाच्या जितक्या टक्कय़ांनी कमी येईल तेवढय़ा प्रमाणात विमा संरक्षित रक्कम आधार धरू न शेतकर्‍यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. शेतकर्‍यांना ही भरपाई उत्पादन खर्चाच्या तुलनेत त्रोटक वाटत असल्याने पीक नुकसानीचा जोखीम स्तर हा ६0 टक्कय़ाहून ८0 टक्के होणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने रब्बी पीक विम्याचा अभ्यास केला आहे. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळाल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. पण रब्बीसह खरीप हंगामातील पिकांचा अभ्यास करू न शेतकर्‍यांना सध्याच्या परिस्थितीनुसार नुकसानभरपाई मिळण्याची गरज शेतकरी वर्गातून अधोरेखित करण्यात येत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी अर्थशास्त्र विभाग नव्याने अभ्यास करणार असल्याचे वृत्त आहे. राज्यात १५ वर्षांपासून रब्बी पिकासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना होणार्‍या नुकसानाची भरपाई देण्यात येत असून, याच अनुषंगाने कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाने रब्बीतील हरभरा पिकाचा पीक विमा काढणार्‍या शेतकरी गटांचा गेल्यावर्षी अभ्यास केला असून, या योजनेमुळे शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची हमी मिळाल्याचे दिसून आले आहे.