शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

खंडवा पोलिसांनी जप्त केलेले ७0 लाखांचे सोने अकोल्यातील सराफाचे!

By admin | Updated: November 27, 2015 01:52 IST

कारागिरासह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अकोला: खंडवा पोलिसांनी इंदोर-अमरावती रोडवर कारमधून जप्त केलेले २ किलो ३00 ग्रॅम सोने आणि ३0 किलो चांदी अकोल्यातील सराफा व्यावसायिकांची असल्याची माहिती समोर आली आहे. खंडवा पोलिसांनी अटक केलेला अकोल्यातील सराफा कारागीर प्रशांत साहू याच्यासह त्याच्या दोन सहकार्‍यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. खंडवा पोलिसांनी गस्तीदरम्यान २४ नोव्हेंबर रोजी रात्री इंदोर-अमरावती रोडने अकोल्याकडे जाणारी एमएच ३0 एएफ ३0१३ क्रमांकाची इंडिका कार थांबविली. कारची तपासणी केली असता, त्यामध्ये अडीच किलो सोने आणि ३0 किलो चांदी मिळून आली. पोलिसांनी अकोल्यातील टॉवर चौकात राहणारा सराफा कारागीर प्रशांत साहू आणि त्याचे दोन सहकारी रीतेश प्रेमसिंह ठाकूर, गोविंद सीताराम (दोघेही रा. अकोला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सोने, चांदी व कार जप्त केली. खंडवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा अकोल्यात सराफा कारागीर आणि व्यवसायी असल्याचे सांगत आहे. त्याचा दागिने घडविण्याचा व्यवसाय असल्याने, त्याने ७0 लाख रुपयांचे सोने इंदोर येथील एका व्यापार्‍याकडून खरेदी केले होते आणि ते घेऊन तो कारने अकोल्याकडे येत होता. सुरुवातीला पोलिसांच्या चौकशीमध्ये त्याने सोने खरेदीची पावती नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या दोन सहकार्‍यांना अटक केली. त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवले. त्यानंतर प्रशांत साहू याने सोने खरेदी पावती खंडवा पोलिसांना दिली. पावतीवरून हे सोने त्याचेच असल्याचे समोर आले. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.