शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अत्युच्च ध्येय ठेवा आणि ते गाठण्याचा प्रयत्न करा - विजय मुनिश्‍वर

By admin | Updated: October 10, 2014 23:45 IST

सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेचा अकोल्यात शानदार शुभारंभ.

अकोला : पूर्वीच्या तुलनेत आता खेळांप्रती विद्यार्थ्यांची रुची वाढत चालली आहे. खेळाला आलेले ग्लॅमर आकर्षित करीत आहे; परंतु आपला खेळ हा देशासाठी सर्मपित असला पाहिजे. खेळात अ त्युच्च ध्येय ठेवा आणि ते गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा, असे आवाहन विदर्भातील पहिले अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू विजय मुनिश्‍वर यांनी शुक्रवारी अकोल्यात केले. प्रभात डे बोर्डिंग स्कूल येथे आयोजित सीबीएसई क्लस्टर - ९ टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन विजय मुनिश्‍वर यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी खेळांमधून संघ भावना, राष्ट्रीय एकात्मता आदी गुण शिकण्यास मिळतात, त्याचा उपयोग जीवनात होतो, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील होते. याप्रसंगी मंचावर सीबीएसईचे निरीक्षक इंद्रजित बासू, टेबल टेनिसचे मुख्य पंच रोहित शिंदे, प्राचार्य कांचन पटोकार, स्कूल ऑफ स्कॉलर्सचे प्राचार्य सुरेश लकडे, गणेश मंगरुळकर, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे आदी मान्यवर उपस्थित होते. आरंभी खेळाडूंचे पथसंचलन झाले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. ध्वजारोहण आणि घंटानाद करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गीत आणि गुजरात गीत सादर करण्यात आले. यावेळी सहा राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक तसेच विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.